वेंगुर्ल्याची पद्मा केळकर बी.ए.एम.एस.मध्ये प्रथम

वेंगुर्ला प्रतिनिधी- गोवा विद्यापिठाचा प्रथम वर्ष बी.ए.एम.एस. अभ्यासक्रमाच्या परिक्षेचा निकाल जाहीर झाला असून यात वेंगुर्ला येथील होमिओपॅथिक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.के.जी.केळकर यांची कन्या कु.पद्मा हिने ७९.२३ टक्के गुण मिळवित विशेष प्राविण्यासह प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. ही परिक्षा जानेवारी २०२२ मध्ये पार पडली.

कु.पद्मा ही भारतीय संस्कृती प्रबोधिनीचे गोमंतक आयुर्वेद महाविद्यालय व संशोधन केंद्र शिरोडा-गोवा या महाविद्यालयात शिक्षण घेत होती. तिने क्रिया शरीर या विषयात ८३.६६ टक्के, पदार्थ विज्ञानमध्ये ७३ टक्के, अष्टांग हृदय या विषयात ७१.३३ टक्के, रचना शरीरमध्ये ८०.३३ टक्के, संस्कृत विषयात ९० टक्के गुण मिळवित यश संपादन केले. या सर्व विषयांसाठी पद्मा हिला प्राचार्य डॉ.अनुरा बाले, डॉ.विजय नंदवाडेकर, डॉ.समिर जोशी, डॉ.मोहंती, डॉ.निलेश कोरडे, डॉ.महेश पाटील, डॉ.कापडी यांचे मार्गदर्शन लाभले.

तिच्या या यशाबद्दल संस्था अध्यक्ष पी.के.घारे, उपाध्यक्ष पांडुरंग देसाई, कार्यवाह गजानन बकले यांच्यासह सर्व सहकारी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांनी तिचे अभिनंदन केले आहे.

You cannot copy content of this page