कवठणी ग्रामपंचायत प्रभाग रिक्त जागेसाठी पांडुरंग हळदणकर यांची बिनविरोध निवड…

⚡सावंतवाडी ता.०९-: कवठणी ग्रामपंचायत प्रभाग क्रमांक ३ मधील रिक्त झालेल्या जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे पांडुरंग भिवा हळदणकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
कवठणी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे ,नेहमीच दुसऱ्यांना सहकार्य करणारे म्हणून श्री.हळदणकर हे परिचित असून त्यांच्या कामाची पोच पावती म्हणून त्यांची “बिनविरोध ” निवड करण्यात आली .
त्याची बिनविरोध निवड होताच त्यांचे सरपंच अजित शंकर कवठणकर तसेच शक्ती केंद्र प्रमुख श्याम नाईक ,बूथ अध्यक्ष अजय दशरथ सावंत , युवा सामाजिक कार्यकर्ते विश्वनाथ हळदणकर ,गावातील ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

You cannot copy content of this page