कुडाळ येथे राष्टीय लोक अदालतीमध्ये २० प्रकरणे तडजोडीने निकाली…

कुडाळ : येथील राष्टीय लोक अदालतीत एकूण २० प्रकरणे तडजोडीने निकाली झाली असून ८,५६,९००/- एवढी रक्कम जमा करण्यात आली आहे.
कुडाळ येथील दिवाणी न्यायालयात आयोजीत राष्टीय लोकअदालतीचे उदघाटन दिवाणी न्यायालय, कुडाळचे सह दिवाणी न्यायाधीश श्रीमती नम्रता अमेय बकरे यांच्या हस्ते दिप प्रज्वलनाने झाले. यावेळी सहाय्यक सरकारी वकील श्रीमती अमृता मिरजे व श्रीमती स्वाती पाटील तसेच वकील आर. डी. बिले , वकील गौरव पडते, वकील श्रीमती कोमल म्हाडदळकर तसेच न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते.
या राष्ट्रीय लोकअदालीतीचे एका पॅनेलमध्ये काम चालले. पॅनल प्रमुख म्हणून श्रीमती नम्रता अमेय बकरे, सह दिवाणी न्यायाधीश कुडाळ यांनी काम पाहिले. पॅनल सदस्य वकील कोमल म्हाडदळकर यांनी काम पाहिले. या राष्ट्रीय लोकअदालतीत दिवाणी व फौजदारी स्वरुपात ६८ प्रलंबित प्रकरणे ठेवण्यात आली होती त्यापैकी १८ प्रकरणे निकाली झाली. तसेच वादपूर्व ७२४ प्रकरणांपैकी २ प्रकरणे निकाली झाली. एकूण ७९२ प्रकरणांपैकी २० प्रकरणे निकाली निघून ८,५६,९००/- एवढया रक्कमेची वसूली करण्यात आली.
सदर राष्टीय लोकअदालीत यशस्वी करणेसाठी बँक आफ इंडीया, स्टेट बॅंक ऑफ इंडिया, बॅंक ऑफ महाराष्ट, बँक ऑफ बडोदा, युनियन बॅंक, महाराष्ट्र ग्रामीण बॅंक, कॅनरा बॅंक, सेंटल बॅंकचे शाखाधिकारी तसेच वीज वितरण कंपनी यांचे लेखापाल उपस्थित होते. सदर राष्ट्रीय लोकअदालतीचे काम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी न्यायालयाचे सहायक अधिक्षक सी.एस.नाईक, तसेच न्यायालयाचे कर्मचारी शव्ही.बी.गुरव, लघुलेखक, आर.टी.आरेकर, वरीष्ठ लिपीक, कनिष्ठ लिपीक अे.अे.परब, श्रीमती अे.पी.कदम, श्रीमती एस.एस.बालम, एच.ए.कारेकर, श्रीमती पी.डी.केळूसकर आणि चपराशी श्री.करंगुटकर, श्री.परब यांनी परीश्रम घेतले.

You cannot copy content of this page