वेंगुर्ला ता.०८-:* काही दिवसांपासून तुळस घाटी परिसरात अज्ञातांकडून मोठ्या प्रमाणात कचरा फेकला जात आहे. मॉर्निग वॉकसाठी येणारे, पाळीव जनावरे, प्रवासी यांना काचांपासून तसेच कच-याच्या दुर्गंधीपासून धोका निर्माण होत होता. ही गंभीर बाब लक्षात घेऊन वेताळ प्रतिष्ठानतर्फे व तुळस ग्रामपंचायतीच्या सहकार्याने सुमारे ४ किमीचा तुळस घाटीचा परिसर स्वच्छ करण्यात आला. यावेळी जमा करण्यात आलेल्या कचरा वर्गीकरण करण्यात आला असून तो वेंगुर्ला नगरपरिषदेकडे देण्यात आला.
प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक तिरोडकर, सचिव सचिन परुळकर, गुरुदास तिरोडकर, सागर सावंत, सद्गुरू सावंत, महेश राऊळ, निखिल ढोले, बंटी सावंत, रोहन राऊळ, वैष्णवी परुळकर, सानिया वराडकर, प्रज्वल परुळकर, हेमलता राऊळ, समर्थ तुळसकर, दीनानाथ साळगावकर आदींनी यात सक्रीय सहभाग घेतला. तर सरपंच शंकर घारे, सदस्य जयवंत तुळसकर व सामाजिक कार्यकर्ते नारायण नागवेकर यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. ग्रामपंचायततर्फे स्वच्छता फलक लावून सुद्धा बेजबाबदारपणे कचरा फेकण्याची काम अज्ञातांकडून होत असल्याने प्रतिष्ठान व ग्रामपंचायतीच्यावतीने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.
