उत्तम आरोग्यासाठी योगा आणि प्राणायाम आवश्यक…
पतंजली योग समितीचे सदस्य प्रा. एस एन पाटील यांचे प्रतिपादन…. वैभववाडी प्रतिनिधीप्रत्येक व्यक्ती आपल्या कामात आणि सांसारिक व्यापामध्ये बिझी आहे. धावपळ आणि धकाधकीच्या जीवनात उत्तम आरोग्यासाठी योगा आणि प्राणायाम आवश्यक आहे असे प्रतिपादन वैभववाडी पतंजली योग समितीचे सदस्य प्रा.श्री.एस.एन.पाटील यांनी केले.२१ जून,२०२२ रोजी आठवा आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रम वैभववाडी पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक श्री.अमित यादव…
