Global Maharashtra Breaking News

मालवणात होणार विभागस्तरीय टेबलटेनिस स्पर्धा

मालवण ता.२६-:* महासिंधु टेबल टेनिस असोसिएशन जिल्हा सिंधुदुर्ग आणि भंडारी हायस्कूलची दहावीची १९७१- ७२ बॅचच्यावतीने येथे १४ व १५ मे रोजी विभागीय टेबल टेनिस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती असोसिएशनचे अध्यक्ष विष्णू कोरगावकर व सचिव हेमंत वालकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. मालवण चिवला बीच येथील हॉटेल गुरूज् किचन येथे पत्रकार परिषद झाली. यावेळी…

Read More

विनापास वाळूची वाहतूक करणारा डंपर महसूलने पकडला

मालवण ता.२६-:* विनापास वाळूची वाहतूक करणारा कुडाळ येथील डंपर मालवण महसूल विभागाच्या पथकाने मालवण कुडाळ मार्गावरील चौके येथे पकडला आहे. डंपर मालकास दंडात्मक कारवाईची नोटीस मालवण तहसीलदारांनी बजावली आहे. मालवण कुडाळ मार्गावरून वाळूची वाहतूक करणारा डंपर (क्र. :- KA- 22- बी- 8379) चौके येथे पेट्रोल पंप नजीकच्या रस्त्यावर महसूल विभागाच्या पथकाने अडवला असता डंपर चालकाकडे…

Read More

विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून आमदार वैभव नाईक यांचा वाढदिवस साजरा…

मालवण ता.२६-: आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त मालवण तालुका शिवसेनेच्या वतीने विविध कार्यक्रम पार पडले. दुपारी मालवणात दाखल झालेल्या आमदार वैभव नाईक यांचा शिवसेना शाखा मालवण येथे बहुसंख्य शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांच्या उपस्थितीत केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी आम. नाईक यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. आम. वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेतर्फे आयोजित महा…

Read More

जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत रेवतळे मालवण संघ विजयी…

तर यंगस्टार कणकवली उपविजेता मालवण दि प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी फेडरेशन यांच्या मान्यतेने मालवण तालुका कबड्डी फेडरेशन च्या सहकार्याने व नवतरुण मित्र मंडळ डांगमोडे आणि ग्रामस्थांच्या वतीने आयोजित मसुरे डांगमोडे येथील भवानी मातेच्या वार्षिक गोंधळ विधिनिमित्त जिल्हास्तरीय पुरुष कबड्डी सामन्यांमध्ये रेवतळे मालवण या संघाने चषकावर नाव कोरले तर उपविजेता म्हणून यंगस्टार कणकवली या संघाने चषकावर…

Read More

आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त हडी येथे खाऊ वाटप

शालेय मुलांना दिले खाऊ मालवण ता.२६-:* मालवण कुडाळचे आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त हडी गावातील शाळांमधील मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले. शिवसेना महिला मालवण उपतालुका प्रमुख सौ. पूजा तोंडवळकर यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला. मालवण कुडाळचे आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त मालवण तालुक्यात ठिकठिकाणी भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हडी गावातील जि. प….

Read More

विजयराव नाईक कॉलेज आयोजित शिबिरात 80 महिलांची मोफत आरोग्य तपासणी

कणकवली ता.२६-:* शिवसेनेचे आमदार व विजयराव नाईक फार्मसी कॉलेजचे संस्थापक वैभव नाईक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिरवल येथील विजयराव नाईक फार्मसी कॉलेजच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान व महिलांच्या आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन उद्योजक सतीश विजयराव नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. तर महिलांच्या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन आमदार…

Read More

पालकमंत्र्यांचे राज्य सरकारमध्ये वजन नाही

त्यामुळे जिल्हा नियोजनचा निधी दायित्वासाठी द्यावा लागला;भाजप नेते रणजित देसाई यांची टीका ओरोस ता.२६ –:दायित्वाची रक्कम जिल्हा पतिषदेचा प्राप्त झाल्यानंतर “देर आये दुरुस्त आये” अशा शब्दात भाजपच्या रणजित देसाई यांनी टोला लगावला आहे. मात्र हीच रक्कम राज्य शासनाकडून परत आणली असती तर जिल्ह्यात सुमारे ४६ कोटी रुपयांची ज्यादा विकास कामे करता आली असती. परंतु सत्ताधार्‍यांच्या…

Read More

आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त असगणी येथील शाळेतील मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप

मालवण ता.२६-:आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त असगणी येथील शाळा नं १ व कुस्थळवाडी शाळा या प्रशालेतील मुलांना आडवली माडली मतदार संघाचे विभाग प्रमुख बंडु चव्हाण व असगणी सरपंच हेमंत पारकर व शाखा प्रमुख देवेंद्र पुजारे यांच्या सौजन्याने शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी उपसरपंच यशवंत राऊत, शाखा प्रमुख देवेंद्र पुजारे,शालेय समिती अध्यक्ष सुर्वणा कासले,माजी सरपंच…

Read More

गुढीपाडव्यानिमित्त देवगड येथे शोभा दिंडीचे आयोजन…

शहर विकास ग्रामस्थ मंडळाच्या वतीने आयोजन देवगड ता.२६-:* देवगड शहर विकास ग्रामस्थ मंडळ यांच्या वतीने गुढीपाडव्याचे औचित्य साधून शनिवार दिनांक २ एप्रिल २०२२ रोजी दुपारी ३.३० वाजता देवगड किल्ला ते स्वामी समर्थ मंदिर (ग्रामीण रुग्णालय देवगड) पर्यंत भव्य शोभा दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. सदर दिंडीत ढोल पथक ,महिला लेझीम पथक, वाडा हायस्कूल मुला मुलींचे…

Read More

वेंगुर्ले येथे ‘बेटी बचाओ बेटी पढावो’ कार्यक्रमा माध्यमातून जनजागृती…

एकात्मिक बालविकास सेवा योजने तर्फे आयोजन वेंगुर्ले ता.२६-:* एकात्मिक बालविकास सेवा योजना वेंगुर्लाच्या वतीने आयोजित ‘बेटी बचाओ बेटी पढावो’ या कार्यक्रमा माध्यमातून जनजागृती करण्यात आली. वेंगुर्ले येथील साई दरबार हॉलच्या सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन वेंगुर्ले पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी सौ. उमा घारगे-पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून…

Read More
You cannot copy content of this page