Headlines

Global Maharashtra Breaking News

आम्ही थेट उद्धव ठाकरेंशी बोलू;

आजुबाजूचे लोक त्यांनी बाहेर ठेवावे; दीपक केसरकरांचं मोठं विधान ⚡मुंबई दि.०७-: शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलवल्यास आम्ही नक्की जाऊ, असं मोठं विधान दीपक केसरकर यांनी केलं आहे. आम्ही थेट उद्धव ठाकरेंशी बोलू. मात्र आजुबाजूचे लोक त्यांनी बाहेर ठेवावे. तसेच आता आम्ही भाजपासह असल्यामुळे त्यांच्यासोबतही संवाद साधावा लागेल, असं दीपक केसरकर यांनी…

Read More

चिरे खाणीतील माती वाहून बागायतीत आल्याने बागायतीचे नुकसान…

⚡सावंतवाडी ता.०७-: मळेवाड सावळवाडी येथील गोविंद महादेव सावळे यांच्या बागायतीत चिरे खाणीतील माती वाहून आल्याने नुकसान झाले आहे.मळेवाड सावळवाडी येथील गोविंद महादेव सावळ यांची माड बागायत व सुपारी ची बाग आहे .त्याचप्रमाणे मिरी लागवड व इतर आंतर पिके घेतली आहेत. या बागेच्या वरच्या बाजूला फार मोठ्या प्रमाणात चिरे खाणींचा व्यवसाय चालतो.गेले दोन दिवस जोरदार अतिवृष्टी…

Read More

साने गुरुजी वाचन मंदिरात ‘आषाढस्य प्रथम दिवसे’ कार्यक्रम संपन्न

⚡मालवण ता.०७-: मालवण येथील बॅ. नाथ पै सेवांगण संचलित साने गुरुजी वाचन मंदिरतर्फे आषाढस्य प्रथम दिवसे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त टोपीवाला हायस्कूलचे शिक्षक महेश धामापूरकर यांचे महाकवी कालिदास यांच्यावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. प्रारंभी साने गुरुजी यांच्या प्रतिमेला महेश धामापूरकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून झाली. संस्थेतर्फे कार्यवाह लक्ष्मीकांत खोबरेकर यांच्या…

Read More

पावसाळ्यासाठी मालवण न.प. कडून आपत्कालीन व्यवस्थापन पथके गठीत

⚡मालवण ता.०७-: मालवण शहरात कोसळणाऱ्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मालवण नगरपालिकेने आपत्कालीन व्यवस्थापन उपाययोजना जाहीर केली असून शहरातील विभागानुसार आपत्कालीन व्यवस्थापन पथके नेमण्यात आली आहेत. पावसादरम्यान शहरात उद्भवणाऱ्या समस्यांबाबत उपाययोजनेसाठी नागरिकांनी नगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन क्रमांकावर तसेच पथकातील व्यक्तींशी संपर्क साधावा, असे आवाहन मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी केले आहे. पावसाळ्यात मालवण शहरातील कोणाच्या घरात पाणी शिरले किंवा…

Read More

खैदा येथील विठ्ठल रखुमाई मंदिरात आषाढी एकादशी उत्सव

⚡मालवण ता.०७-: मालवण तालुक्यातील खैदा येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात आषाढी एकादशी उत्सव रविवार दि.१० जुलै रोजी साजरा होणार आहे. यानिमित्त मंदिरात सकाळी ७.३० वा.पासून दीड प्रहरचा अखंड हरिनाम सप्ताह सुरू होणार असून श्री विठ्ठल रखुमाई पदस्पर्श दर्शन व ओटी भरण्याचे कार्यक्रम होतील. तरी सर्व भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन खैदा ग्रामस्थ मंडळातर्फे करण्यात आले…

Read More

३४ विद्यार्थ्यांनी टू ब्राऊन बेल्ट कराटे परीक्षेत मिळविले यश

वेंगुर्ले (प्रतिनिधी)-वेंगुर्ले साईदरबार हॉल येथे घेण्यांत आलेल्या टु ब्राऊन बेल्ट कराटे परीक्षेत 34 विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. या परीक्षेत यश पटकाविलेल्या सर्व कराटेपटु विद्यार्थ्यांना महाराष्ट्र कराटे संस्थेचे अध्यक्ष अँन्थोनी कार्निओ व उपाध्यक्ष प्रकाश सोरप यांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण करण्यांत आले. येथील साईदरबार हॉलमध्ये महाराष्ट्र कराटे संस्थेचे अध्यक्ष अँन्थोनी कार्निओ व उपाध्यक्ष प्रकाश सोरप यांच्या अधिपत्याखाली…

Read More

कनेडी गट शिक्षण संस्थेचा १० जुलै रोजी वर्धापन दिन ;खास. विनायक राऊत उपस्थित राहणार

⚡कणकवली ता.०७-: कनेडी गटशिक्षण प्रसारक मंडळ मुंबई या संस्थेचा ६८ वा वर्धापन दिन रविवार १० जुलैला साजरा होत आहे. यावेळी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे खासदार विनायक राऊत उपस्थित राहणार असून त्यांच्याहस्ते विद्यार्थ्यांचा गुणगौरव होणार आहे. यावेळी अद्यावत अशा व्यायाम शाळेची उद्घाटनही होणार आहे. ७ जुलै रोजी सकाळी १० वाजता संस्थेच्या ज्ञानदीप सभागृहांमध्ये वर्धापन दिनाचा…

Read More

अपघातात मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी ठेकेदार व अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा

नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केली मागणी ⚡कणकवली ता.०७-: कणकवली शहरातील फ्लाय ओव्हर ब्रिजवर गुरुवारी रात्री झालेल्या अपघातात दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या मृत्यूला महामार्ग चौपदरीकरण ठेकेदार कंपनी व महामार्ग अधिकाऱ्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केली आहे. गेली दोन वर्ष महामार्ग चौपदरीकरण अंतर्गत अनेक समस्या प्रलंबित…

Read More

प्लास्टिक कारवाईच्या विरोधात व्यापाऱ्यांची नगरपंचायतमध्ये धडक

नियम न पाळल्यास कारवाई करा;नगराध्यक्ष समीर नलावडे यांचे आदेश ⚡कणकवली ता.०७-: शंभर मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्या, तसेच कमी जाडीच्या प्लास्टिकचे इतर साहित्‍य आढळले तर नगरपंचायत कडून कारवाई केली गेली. मात्र याबाबत नगरपंचायतने जनजागृती करायला हवी होती. अशी मागणी करत कणकवली शहरातील अनेक व्यापाऱ्यांनी व प्लास्टिक विक्रेत्यांनी नगराध्यक्ष समीर नलावडे यांची भेट घेत चर्चा केली.जुन्या स्टॉक…

Read More

वेंगुर्लेत प्लास्टिक जप्ती मोहीम सुरू

दहा किलो प्लास्टिक केले जप्त ⚡वेंगुर्ल ता.०७- : शासनाच्या नवीन नियमांनुसार प्लास्टिक वापरावर ६ जुलैपासून कारवाई करण्यात येणार असल्याचे वेंगुर्ला नगरपरिषदेने जाहीर केले होते. त्यानुसार प्लास्टिक जप्तीची मोहिम राबविण्यात आली. यात सुमारे १० किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.

Read More
You cannot copy content of this page