वेंगुर्ले (प्रतिनिधी)-
वेंगुर्ले साईदरबार हॉल येथे घेण्यांत आलेल्या टु ब्राऊन बेल्ट कराटे परीक्षेत 34 विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. या परीक्षेत यश पटकाविलेल्या सर्व कराटेपटु विद्यार्थ्यांना महाराष्ट्र कराटे संस्थेचे अध्यक्ष अँन्थोनी कार्निओ व उपाध्यक्ष प्रकाश सोरप यांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण करण्यांत आले.
येथील साईदरबार हॉलमध्ये महाराष्ट्र कराटे संस्थेचे अध्यक्ष अँन्थोनी कार्निओ व उपाध्यक्ष प्रकाश सोरप यांच्या अधिपत्याखाली कृष्णा कराटे प्रशिक्षण संस्थेच्या मुलांची नुकतीच टु ब्राऊन बेल्ट कराटे परीक्षा घेण्यांत आली. यापरीक्षेस बसलेले सर्व म्हणजे 34 विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले.
यात फर्स्ट नॉन व्हाईट बेल्ट परीक्षेत– कोमल विश्राम घाडी, भुमिका नरसिंह घाडी, गौरी राजन वाडकर, दिव्यांका नामदेव लटम, मनस्वी परशुराम अलगुर, पृथा राघवेंद्र जाशी, वरद विश्वनाथ जगताप, अथर्व उत्तम तोडकर यांनी, सेकंड नॉन व्हाईट बेल्ट परीक्षेत– कोमल विश्राम घाडी, भुमिका नरसिंह घाडी, गौरी राजन वाडकर, दिव्यांका नामदेव लटम, मनस्वी परशुराम अलगुर, पृथा राघवेंद्र जाशी, वरद विश्वनाथ जगताप, अथर्व उत्तम तोडकर यांनी, येलो बेल्ट परीक्षेत– संजना दयानंद जंगले, आर्या सदानंद ओगले, रूशिल सुशांत धुरी, उन्मेश उदय साळकर यांनी, ऑरेंज बेल्ट परीक्षेत– संजना दयानंद जंगले, आर्या सदानंद ओगले, रूशिल सुशांत धुरी, उन्मेश उदय साळकर यांनी, ग्रीन बेल्ट परीक्षेत– जान्हवी गजानन मडकईकर, अथर्व कृष्णा केळजी, डेविना डॉमनिक डिसोजा यांनी, ब्लू बेल्ट परीक्षेत– जान्हवी गजानन मडकईकर, अथर्व कृष्णा केळजी, डेविना डॉमनिक डिसोजा, निर्जला श्रीकांत पाटील यांनी पर्पल बेल्ट परीक्षेत– निर्जला श्रीकांत पाटील हिने तर ब्राऊन बेल्ट परीक्षेत– हिमानी गजानन मडकईकर अशा 34 विद्यार्थ्यांनी कराटे परीक्षेत यश संपादन केले. या सर्व विद्यार्थ्यांना कराटे प्रशिक्षक (सॅनसाय) पुंडलिक हळदणकर व कृष्णा हळदणकर यांचे मार्गदर्शन लाभले.
या कराटे परीक्षेत यश पटाकाविणाऱ्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र कराटे संस्थेचे अध्यक्ष अँन्थोनी कार्निओ व उपाध्यक्ष प्रकाश सोरप यांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण करण्यांत आले.
