वेंगुर्लेत प्लास्टिक जप्ती मोहीम सुरू

दहा किलो प्लास्टिक केले जप्त

⚡वेंगुर्ल ता.०७- : शासनाच्या नवीन नियमांनुसार प्लास्टिक वापरावर ६ जुलैपासून कारवाई करण्यात येणार असल्याचे वेंगुर्ला नगरपरिषदेने जाहीर केले होते. त्यानुसार प्लास्टिक जप्तीची मोहिम राबविण्यात आली. यात सुमारे १० किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.

  शहरातील बाजारपेठ, बॅ.खर्डेकर रोड, बॅ.नाथ पै रोड, माणिकचौक आदी परिसरात राबविण्यात आलेल्या या प्लास्टिक जप्त मोहिमेच्या पथकात आनंद परब, रविराज खतकर, सचिन काकड, अभिजित गिरप, निशा आळवे, पंकज केळुसकर, स्वप्निल कोरगांवकर, विठ्ठल सोकटे, मंदार चौकेकर आदींचा सहभाग होता. शासनाने प्लास्टिक बंदीबाबत नविन नियमांप्रमाणे कमी मायक्रॉनच्या प्लास्टिक वापरावर घातलेल्या बंदीचे उल्लंघन करणा-यांवर आगामी काळात दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचे नगरपरिषदेकडून सांगण्यात आले.
You cannot copy content of this page