Headlines

Global Maharashtra Breaking News

केंद्रशाळा मळगाव ब्राम्हणपाट शाळेने राबविला बळीराजासाठी एक दिवस उपक्रम

बांधावरच भरविली शाळा ⚡सावंतवाडी ता.११सहदेव राऊळ-: केंद्रशाळा मळगाव ब्राम्हणपाट शाळेने जिल्हा परिषदेच्या बळीराजासाठी एक दिवस या उपक्रमांतर्गत बांधावरची शाळा उपक्रम राबविला. यावेळी मुलांनी शेतावर जाऊन शेतीच्या विविध कामांचा आनंद लुटला. विध्यार्थ्यांना शेतकऱ्यांबद्दल आदर निर्माण व्हावा, शेती विषयी माहिती मिळावी, शेतीसाठी लागणारे बी बियाणे, शेतीची अवजारे, खते, कीटकनाशके ह्या गोष्टींचा परिचय व्हावा या हेतूने जिल्हा परिषद…

Read More

“त्या” १६ आमदारांना मोठा दिलासा,

सुनावणी पूर्ण होईपर्यंत कारवाई नको, सुप्रिम कोर्टाची विधानसभा अध्यक्षांना सूचना ⚡मुंबई दि.११-: एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील राज्यातील सरकारला आज मोठा दिलासा मिळाला आहे. सुप्रिम कोर्टामध्ये आज झालेल्या सुनावणीमध्ये १६ बंडखोर आमदारांवर सुनावणी पूर्ण होईपर्यंत कुठलीही कारवाई करू नये, असे आदेश सुप्रिम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना दिले आहेत. तसेच या प्रकरणाची सुनावणी करण्यासाठी घटनापीठाची नियुक्ती करण्यात येणार…

Read More

कौस्तुभ नाईक यांचा मनसेत प्रवेश

राष्ट्रवादीला धक्का;सावंतवाडी विधानसभा अध्यक्ष म्हणून होते कार्यरत ⚡सावंतवाडी ता.११-: राष्ट्रवादी काँग्रेस सावंतवाडी विधानसभा अध्यक्ष कौस्तुभ नाईक यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन मनसे विद्यार्थी सेना अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेत प्रवेश केला आहे. यावेळी माजी आमदार तथा मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर उपस्थित होते.

Read More

कुडाळ तालुक्यात सर्वाधिक 51.6 मि.मी. पाऊस

⚡सिंधुदुर्गनगरी ता.११-: गेल्या चौवीस तासात कुडाळ तालुक्यात सर्वाधिक 51.6 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 37.9 मि.मी. पाऊस झाला आहे. तर एकूण सरासरी 1563.1 मि.मी. पाऊस झाला आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. देवगड- 15.7 (1341.5), मालवण- 33.3 (1488.1), सावंतवाडी- 45.6 (1864.2), वेंगुर्ला-…

Read More

आंबोली ग्रामस्थांची वीज कर्मचारी वाढविण्याची मागणी

आंबोली, ता.११: येथील विजेच्या समस्या संदर्भात वीज अधीक्षकांनी तत्काळ दखल घेवून आंबोलीत कर्मचारी वाढवावे अशी मागणी आंबोली ग्रामस्थांनी केली आहे. आंबोलीत वर्षा पर्यटन नियोजनासाठी च्या बैठकीत यासंदर्भात तहसीलदार यांना विजेच्या संदर्भात सांगितल्यानंतर त्यांनी कुडाळ येथून जास्त स्टाफ उपलब्ध करू असे पत्र देतो असे सांगितले.मात्र तसे काही झाले नाही.आंबोलीत यापूर्वी ४ ते ५ कर्मचारी होते.आता फक्त…

Read More

वेर्ले उपसरपंच सुभाष राऊळ यांची घरवापसी

राजन तेली यांच्या उपस्थितीत केला पुन्हा भाजप प्रवेश ⚡सावंतवाडी ता.११-: वेर्ले गावचे उपसरपंच सुभाष राऊळ यांनी अलीकडेच शिवसेनेत प्रवेश केला होता परंतु आज त्यांनी राजन तेली आणि रवींद्र मडगावकर यांच्या उपस्थितीत आपल्या सहकाऱ्यांसमवेत घर वापसी करत पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी आंतोंन फर्नांडिस, शिवा राऊळ, लाडजी राऊळ, सुनील राऊळ, बंड्या सावंत, मोहन राऊळ, प्रताप…

Read More

संततधार पावसामुळे सावंतवाडी भाजी मार्केट येथील छप्पर कोसळून नुकसान

सुदैवाने अनर्थ टाळला : नगरसेवक आनंद नेवगी यांनी दिली माहिती ⚡सावंतवाडी ता.११-: गेले काही दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे सावंतवाडी भाजी मार्केट येथील छप्पर कोसळून किरकोळ नुकसान झाले आहे. सुदैवाने त्यावेळी बाजारपेठेत कोणीही नसल्याने मोठा अनर्थ टळला आहे. ही घटना आज सकाळी घडली असून, याबाबतची माहिती माजी नगरसेवक आनंद नेवगी यांनी दिली आहे.

Read More

पाणी पुरवठा करणारे पाळणेकोंड धरण भरले

माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांची माहिती;सावंतवाडी शहर वासियांना दिलासा सावंतवाडी,ता.११ शहराला पाणीपुरवठा करणारे पाळणेकोंड धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. पाण्याची पातळी वाढल्यामुळे सर्व दरवाजे उघडण्यात आले आहेत. हे धरण काल एकादशी दिवशी पूर्ण क्षमतेने भरले असल्याची माहिती माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी दिली. दरम्यान जुलै महिन्यात पूर्ण क्षमतेने धरण भरल्याने शहरवासीयांसाठी दिलासादायक असल्याचे साळगावकर यांनी…

Read More

रोटेरियन हे मानवतेचे स्वयंसेवक- नसीरभाई बोरसादवाला

⚡मालवण ता.१०-:रोटरी क्लब ही मानवहितासाठी कार्यरत असणारी संस्था आहे. यातील प्रत्येक रोटेरियन हा आव्हान स्वीकारुन समाज मजबूत करण्यासाठी काम करत असतो. रोटरीचे कार्य चिरंतन असून प्रत्येक सदस्य हा आयुष्यभर रोटेरियन असतो. रोटरीच्या माध्यमातून काम करणारे रोटेरियन हे मानवतेचे स्वयंसेवक आहेत असे प्रतिपादन रोटरी क्लबचे डिजीई नसीरभाई बोरसादवाला यांनी येथे बोलताना केले. रोटरी क्लब ऑफ मालवणच्या…

Read More

मळेवाड जकातनाका येथील दुकानाला वादळी पावसाचा तडाखा

⚡सावंतवाडी ता.१०सहदेव राऊळ-: आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास झालेल्या जोरदार वारा, पावसाच्या तडाख्यात मळेवाड जकातनाका येथील वसंत विठ्ठल नाईक यांच्या मालकीच्या इमारतीच्या छप्परावर अचानक झाडाची भली मोठी फांदी मोडून पडली. त्यामुळे नाईक यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. या इमारतीमध्ये दुकाने असून दुपारची वेळ असल्याने सुदैवाने येथे कोणीही नव्हते. त्यामुळे मोठा अनर्थ टळला, मात्र या…

Read More
You cannot copy content of this page