Headlines

मळेवाड जकातनाका येथील दुकानाला वादळी पावसाचा तडाखा

⚡सावंतवाडी ता.१०सहदेव राऊळ-: आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास झालेल्या जोरदार वारा, पावसाच्या तडाख्यात मळेवाड जकातनाका येथील वसंत विठ्ठल नाईक यांच्या मालकीच्या इमारतीच्या छप्परावर अचानक झाडाची भली मोठी फांदी मोडून पडली. त्यामुळे नाईक यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. या इमारतीमध्ये दुकाने असून दुपारची वेळ असल्याने सुदैवाने येथे कोणीही नव्हते. त्यामुळे मोठा अनर्थ टळला, मात्र या घटनेत नाईक यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

यावेळी वसंत नाईक, भाई नाईक, प्रतीक नाईक, विघ्नेश नाईक, सत्यनारायण कळंगुटकर यांनी तात्काळ सदरील झाडाची फांदी कटर च्या साहाय्याने तोडून बाजूला केली.

You cannot copy content of this page