केंद्रशाळा मळगाव ब्राम्हणपाट शाळेने राबविला बळीराजासाठी एक दिवस उपक्रम

बांधावरच भरविली शाळा

⚡सावंतवाडी ता.११सहदेव राऊळ-: केंद्रशाळा मळगाव ब्राम्हणपाट शाळेने जिल्हा परिषदेच्या बळीराजासाठी एक दिवस या उपक्रमांतर्गत बांधावरची शाळा उपक्रम राबविला. यावेळी मुलांनी शेतावर जाऊन शेतीच्या विविध कामांचा आनंद लुटला.

विध्यार्थ्यांना शेतकऱ्यांबद्दल आदर निर्माण व्हावा, शेती विषयी माहिती मिळावी, शेतीसाठी लागणारे बी बियाणे, शेतीची अवजारे, खते, कीटकनाशके ह्या गोष्टींचा परिचय व्हावा या हेतूने जिल्हा परिषद सिंधुदुर्गच्यावतीने बळीराजासाठी एक दिवस हा उपक्रम जिल्ह्यातील सर्व शाळा मध्ये राबविला जातो.
याच उपक्रमांतर्गत केंद्रशाळा मळगाव ब्राम्हणपाट शाळेने एक दिवस बळीराजासाठी उपक्रमात सहभाग घेतला. जवळील शेतात शेतीविषयी माहिती घेतली. यावेळी शाळेतील शिक्षक व मुलांनी शेतीच्या विविध कामांसही त तरवा काढणी, लावणी आदी कामांचा आनंद लुटला.यावेळी शाळेतील शिक्षक, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.

You cannot copy content of this page