Headlines

प्रसन्ना उर्फ बाळू देसाई यांचा शैक्षणिक क्षेत्रासाठी महत्त्वाकांक्षी उपक्रम….

श्री. देसाई यांच्याकडून वेंगुर्ला बॅ. खर्डेकर महाविद्यालयास जेईई, नीटची पुस्तके भेट

वेंगुर्ला
वेंगुर्ला तालुक्यातील
बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय, वेंगुर्ला चे माजी विद्यार्थी तथा सामाजिक कार्यकर्ते प्रसन्ना उर्फ बाळु देसाई यांनी महाविद्यालयाच्या ग्रंथालयास जेईई (JEE) व नीट (NEET) परीक्षांच्या तयारीसाठी उपयुक्त पुस्तके भेट दिली आहेत. त्यांच्या या उपक्रमामुळे अभियांत्रिकी व वैद्यकीय प्रवेश परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना दर्जेदार संदर्भ साहित्य उपलब्ध होणार आहे.
स्पर्धात्मक परीक्षांच्या तयारीसाठी आवश्यक पुस्तके महाविद्यालयाच्या ग्रंथालयात उपलब्ध व्हावीत, या उद्देशाने प्रसन्ना देसाई यांनी हा उपक्रम राबविला. विद्यार्थ्यांनी या पुस्तकांचा जास्तीत जास्त उपयोग करून स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यश संपादन करावे, अशी अपेक्षा प्राचार्य डॉ. धनराज गोस्वामी यांनी व्यक्त केली. माजी विद्यार्थ्यांनी आपल्या महाविद्यालयाशी असलेले ऋणानुबंध जपत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजांसाठी केलेले हे योगदान प्रेरणादायी असल्याचे प्राचार्य डॉ. धनराज गोस्वामी यांनी नमूद केले. यावेळी प्राचार्य डॉ. धनराज गोस्वामी, संस्था प्रतिनिधी सुरेंद्र चव्हाण, ग्रंथपाल शुभदा माने, डॉ. सचिन परूळकर, डॉ .मनिषा मजुमदार, डॉ. सुनील भिसे, डॉ. कलमेश कांबळे, डॉ. संदीप वर्पे आदी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी प्रसन्ना देसाई यांच्या उपक्रमाचे स्वागत करून त्यांचे आभार मानले. प्रसन्ना उर्फ बाळू देसाई हे गेली सुमारे 25 वर्षे सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रात आपल्या सामाजिक उपक्रमाद्वारे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रसिद्ध आहेत. त्यांनी शैक्षणिक क्षेत्रासाठी राबविलेल्या या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचे वेंगुर्ला तालुक्यासह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातून कौतुक होत आहे.

You cannot copy content of this page