माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांची माहिती;सावंतवाडी शहर वासियांना दिलासा
सावंतवाडी,ता.११ शहराला पाणीपुरवठा करणारे पाळणेकोंड धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. पाण्याची पातळी वाढल्यामुळे सर्व दरवाजे उघडण्यात आले आहेत. हे धरण काल एकादशी दिवशी पूर्ण क्षमतेने भरले असल्याची माहिती माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी दिली. दरम्यान जुलै महिन्यात पूर्ण क्षमतेने धरण भरल्याने शहरवासीयांसाठी दिलासादायक असल्याचे साळगावकर यांनी म्हटले आहे.
