सुदैवाने अनर्थ टाळला : नगरसेवक आनंद नेवगी यांनी दिली माहिती
⚡सावंतवाडी ता.११-: गेले काही दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे सावंतवाडी भाजी मार्केट येथील छप्पर कोसळून किरकोळ नुकसान झाले आहे. सुदैवाने त्यावेळी बाजारपेठेत कोणीही नसल्याने मोठा अनर्थ टळला आहे. ही घटना आज सकाळी घडली असून, याबाबतची माहिती माजी नगरसेवक आनंद नेवगी यांनी दिली आहे.
