आंबोली, ता.११: येथील विजेच्या समस्या संदर्भात वीज अधीक्षकांनी तत्काळ दखल घेवून आंबोलीत कर्मचारी वाढवावे अशी मागणी आंबोली ग्रामस्थांनी केली आहे.
आंबोलीत वर्षा पर्यटन नियोजनासाठी च्या बैठकीत यासंदर्भात तहसीलदार यांना विजेच्या संदर्भात सांगितल्यानंतर त्यांनी कुडाळ येथून जास्त स्टाफ उपलब्ध करू असे पत्र देतो असे सांगितले.मात्र तसे काही झाले नाही.आंबोलीत यापूर्वी ४ ते ५ कर्मचारी होते.आता फक्त २ कर्मचाऱ्यांवर डोलारा आहे.
शिवाय कनेक्शन आणि उत्पंन वाढले आहे.मात्र त्यानुसार कर्मचारी वाढवले नाहीत.यासंदर्भात वारंवार मागणी झाली.त्या विभागाने लक्ष दिले नाही किंवा आंबोली माझे दुसरे घर म्हणून सांगणाऱ्या आमदार दीपक केसरकर यांनी कधी या प्रश्नाकडे लक्ष घातले नाही.दरवर्षी आंबोलीत पावसाळ्यात वीज प्रश्न निर्माण होतो.त्यामुळे पावसाळ्यात तरी कर्मचारी जास्त ठेवणे गरजेचे आहे.मात्र याकडे कायम दुर्लक्ष करण्यात येते. वर्षा पर्यटनासाठी हजारो लोक आंबोलीत येतात मात्र लाईट नसल्यामुळे अनेकांची गैरसोय होते.शिवाय पर्यटन व्यावसायकांची देखील गैरसोय होते.नुकसान होते.शिवाय इथे धुके आणि जास्त पाऊस असल्याने लाईट दिवसा देखील घरात सुरू ठेवावी लागते.त्यामुळे प्रशासनाने आणि वीज वितरण च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे तत्काळ लक्ष द्यावे अशी मागणी आंबोली ग्रामस्थांनी केली आहे.तसेच याठिकाणी तांत्रिक अधिकारी ठेवणे आवश्यक आहे.याकडे लक्ष द्यावे.अशी मागणी आहे.
