Headlines

Global Maharashtra Breaking News

राज्यस्तरीय थाई बॉक्सिंग स्पर्धेत सिंधुदुर्गनगरीतील स्पर्धकांची पदकांची कमाई

⚡ओरोस ता.२९-: महाराष्ट्र राज्य थाई बॉक्सिंग स्पर्धेमध्ये सिंधुदुर्गनगरी मधील मुलांनी दमदार कामगिरी केली आहे. यात या मुलांनी दोन सुवर्ण पदक एक रौप्य आणि दोन कास्य पदकांची कमाई केली आहे. १८ वी महाराष्ट्र राज्य थाई बॉक्सिंग स्पर्धा लातूर येथे पार पडली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून निवडक खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले होते. सिंधुदुर्ग जिल्हा थाई बॉक्सिंग असोसिएशन सिंधुदुर्ग…

Read More

शेखर गांवकर यांना मातृशोक…

⚡सावंतवाडी ता.२९-: कवठणी मुरडीवाडी चे माजी ग्रामपंचायत सदस्या व पोस्ट कार्यालयाच्या अल्प बचत च्या प्रतिनिधी प्रभावती आत्माराम गावकर यांचे बुधवारी रात्री 10 च्या सुमारास दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, एक मुली, जावई, सुना, भाऊ, भावजया, पुतणे, पुतण्या, नातवंडे असा मोठा परिवार आहे. भाजपाचे पदाधिकारी शेखर गांवकर यांच्या त्या मातोश्री होत. तसेच जि.प.च्या…

Read More

शिवसेनेच्यावतीने पाडलोसमध्ये वह्या वाटप

⚡बांदा ता.२९-: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी उपतालुकाप्रमुख राजू शेटकर यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नं.1 पाडलोस मध्ये वह्या वाटप केले. यावेळी बुथप्रमुख सुधीर गावडे, तंटामुक्त समिती माजी अध्यक्ष मधुकर परब, पाडलोस सोसायटी संचालक राघोबा गावडे, भजनी बुवा अजित गावडे, मुख्याध्यापक उत्कर्षा परब, सहशिक्षक साहेबराव शेवाळे, ग्रामस्थ, पालक, विद्यार्थी व अन्य मान्यवर उपस्थित…

Read More

मागील चाके सुटल्याने टेम्पो रस्त्यात अडकला

आंबोली घाटातील घटना: वाहतूक खोळंबली आंबोली ता.२९-: आंबोली घाट येथील चाळीस फूट मोरी येथे अरुंद वळणावर टेम्पो ची मागील दोन चाके सुटल्याने टेम्पो रस्त्यात अटकुन पडला आहे. त्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक कोंडी झाली असून, वाहतूक पोलीस महेंद्र देवुलकर आणि विकास जाधव वाहतूक नियंत्रण करण्याचे काम करत आहेत.

Read More

काहीजण शहरातील सुरू असलेली अवजड वाहतूक बंद करण्याच्या मार्गावर

माजी उपनगराध्यक्ष उमाकांत वारंग यांचा आरोप:राजू बेग, दिलीप भालेकर यांच्याकडे निशाणा;व्यापाऱ्यांचा विचार करून अवजड वाहतूक बंद न करण्याची मागणी ⚡सावंतवाडी ता.२८-: येथील मोती तलावाचा केवळ फुटपाथ कोसळला असून, कोणत्याही प्रकारे रस्ता खचला नाही. काहीजण उगाचच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करून, शहरातून मोजक्या प्रमाणात सुरू असणारी वाहतूक अवजड वाहतूकीच्या नावाखाली बंद करण्याच्या मार्गावर आहेत. असा आरोप…

Read More

आ केसरकर समर्थक मुंबईला रवाना

मुख्यमंत्री शिंदे, प्रवक्ते केसरकर यांची घेणार भेट दोडामार्ग ता.२८-: शिंदे गटाचे मुख्य प्रवक्ते तथा आमदार दीपक केसरकर यांचे दोडामार्ग तालुक्यातील समर्थक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आमदार दीपक केसरकर यांची भेट घेण्यासाठी आज मुंबईला रवाना झालेत. यावेळी शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस, जि. प. चे माजी बांधकाम सभापती तुकाराम बर्डे, पं. स. माजी सभाप दयानंद धाऊस्कर,…

Read More

वैभववाडी पंचायत समितीच्या सहा सदस्य पदासाठी आरक्षण जाहीर…

वैभववाडी प्रतिनिधी‌‌वैभववाडी पंचायत समितीचे सहा सदस्य पदाचे आरक्षण सोडत येथील तहसील कार्यालय सभागृहात जाहीर करण्यात आले. पंचायत समितीच्या सहा मतदारसंघाचे आरक्षण सोडत पार पडले. आरक्षण पुढीलप्रमाणे भुईबावडा – सर्वसाधारण, कोळपे नागरिकांचा मागास प्रवर्ग, कोकिसरे – सर्वसाधारण महिला, उंबर्डे – सर्वसाधारण महिला, खांबाळे – सर्वसाधारण, लोरे नं.२ सर्वसाधारण महिला अशा पद्धतीने आहे. आरक्षण सोडत प्रसंगी उपजिल्हाधिकारी…

Read More

गवारेडा आडवा आल्याने ओटवणे येथील तरुण जखमी

⚡सावंतवाडी ता.२८-: सावंतवाडी येथून चराटे येथे आपल्या घरी जात असताना वाटेत गवारेडा आडवा आल्याने ओटवणे येथील शंकर गावकर हे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी नागरिकांनी येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवले आहे, ही घटना आज सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास चराठा परिसरात घडली.

Read More

विशाल परब यांच्यावर भविष्यात मोठी जबाबदारी

भाजप नेते निलेश राणे यांनी दिले संकेत कुडाळ:विशाल परब यांना तूर्तास आमदारकी लढवायची नाही किंवा खासदारकी मी सांगितल्या नंतर ते निश्चितच लढतील. अन्यथा काय खरं नाही. पण जीव असा लावायचा माणसाने की त्याचा स्वार्थ नसेल. असे सांगत विशाल परब यांना भविष्यात खासदार किंवा आमदार करण्याचा सुतोवाच माजी खासदार निलेश राणे यांनी आज येथे केला.विशाल परब…

Read More

श्रावण सोमवार निमित्त मालवण येथील रामेश्वर मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

मालवण दि प्रतिनिधी मालवण शहराची ग्रामदैवते श्री देव रामेश्वर, श्री देव नारायण, श्री देवी सातेरी तसेच इतर मंदिरांमध्ये श्रावण महिन्यानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यामध्ये रविवार दि. ३१ ऑगस्ट रोजी सूर्योदय ते सूर्यास्त रुद्राअभिषेक (संततधार), अखंड नामस्मरण सकाळी ६ सायंकाळी ७ पर्यंत, दि. १ ऑगस्ट रोजी पहिल्या श्रावण सोमवारी सायंकाळी ४ ते ७…

Read More
You cannot copy content of this page