श्रावण सोमवार निमित्त मालवण येथील रामेश्वर मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

मालवण दि प्रतिनिधी

मालवण शहराची ग्रामदैवते श्री देव रामेश्वर, श्री देव नारायण, श्री देवी सातेरी तसेच इतर मंदिरांमध्ये श्रावण महिन्यानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

यामध्ये रविवार दि. ३१ ऑगस्ट रोजी सूर्योदय ते सूर्यास्त रुद्राअभिषेक (संततधार), अखंड नामस्मरण सकाळी ६ सायंकाळी ७ पर्यंत, दि. १ ऑगस्ट रोजी पहिल्या श्रावण सोमवारी सायंकाळी ४ ते ७ गायनाचा कार्यक्रम, शुक्रवार दि. ५ ऑगस्ट रोजी पहिला दादरा (खापरेश्वर) सायंकाळी ६:३० वाजता, रविवार दि. ७ ऑगस्ट रोजी रांजेश्वर व सिसमोडा हे दोन्ही दादरे सायंकाळी ६:३० वाजता निघतील. दुसऱ्या श्रावण सोमवारी सकाळी १० वाजल्यापासून श्री देवी सातेरीची जत्रा, तिसऱ्या श्रावण सोमवारी दि. १५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ ते ८ भजनाचा कार्यक्रम, श्री देव नारायण मंदिरामध्ये गोकुळाष्टमी उत्सव होणार आहे. गुरुवार दि. १८ ऑगस्ट ते मंगळवार २३ ऑगस्ट २०२२ पर्यंत रात्रौ ७:३० वाजल्यापासून पुराण व कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. चौथ्या श्रावण सोमवारी २२ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता लघुरुद्र, सकाळी ९:३० वाजता श्री वरदशंकराची महापूजा व दुपारी १ वाजल्यापासून तिर्थप्रसाद, सायंकाळी ४ ते रात्रौ ९ वाजता सुश्राव्य गायन व भजने, श्री भावई देवीची जत्रा होणार आहे. तरी या कार्यक्रमांचा सर्व भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थानतर्फे करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page