शिवाजी वाचन मंदिरतर्फे स्मरणिका मुखपृष्ठ स्पर्धा

⚡मालवण ता.२८-: मालवण भरड येथील श्री शिवाजी वाचन मंदिर या संस्थेचे शताब्दी वर्ष सुरू आहे. या निमित्ताने शंभर वर्षांच्या वाटचालीचा मागोवा घेण्यासाठी स्मरणिका काढण्याचे ठरविले आहे. या स्मरणिकेच्या मुखपृष्ठासाठी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. विजेत्यांना अनुक्रमे ३ हजार, २ हजार, १ हजार रुपये अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत.

दोन व तीन क्रमांकाची चित्रे स्मरणिकेच्या आतील पानांवर छापण्यात येतील. उर्वरित सर्व चित्रांचे प्रकाशनावेळी प्रदर्शन मांडण्यात येईल. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली व विनाशुल्क आहे. चित्र ‘वाचनालय’ या विषयाशी सुसंगत असावे. चित्राच्या मागील बाजूस नाव, पत्ता, संपर्क क्रमांक लिहावे. चित्र पाठविण्याची अंतिम तारीख ३१ सप्टेंबर ‘राहील. अधिक माहितीसाठी डॉ. सुभाष दिघे- ९४०४७५३७९९ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page