सेवानिवृत्त सेवक संघाची ३८ वी वार्षिक सर्वसाधारण सभेचे रविवारी ७ ऑगस्ट रोजी आयोजन

मालवण दि प्रतिनिधी
मालवण तालुका सेवानिवृत्त सेवक संघाची ३८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि. ७ ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता टोपीवाला हायस्कूल मालवण येथे आयोजित करण्यात आली आहे.

या सभेत सन २०२१-२२ च्या वार्षिक अहवालाचे वाचन करून मंजुरी देने, वार्षिक जमा खर्चास मंजुरी देने, अंदाजपत्रकास मंजुरी देने तसेच संघातील सदस्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत चर्चा करण्यात येणार आहे. तरी सभासदांनी सभेस उपस्थित राहण्याचे आवाहन सेवानिवृत्त सेवक संघाचे अध्यक्ष व सचिव यांच्या वतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page