मालवण दि प्रतिनिधी
कोकणातील मुलांमध्ये खूप बुद्धिमत्ता आहे. प्रशासकीय सेवेच्या माध्यमातून देशसेवा करायची असल्यास स्पर्धा परीक्षेचा सखोल अभ्यास करा. यूपीएससी, एमपीएससी परीक्षांचा न्यूनगंड दूर करा. चौकस ज्ञान आत्मसात करण्यासाठी अभ्यासक्रमा व्यतिरिक्त अवांतर वाचनात सातत्य ठेवले पाहिजे. तुम्ही निवडलेल्या क्षेत्राबाबत सकारात्मक राहिलात तर तुमच्यासाठी यशाची दारे सदैव खुली असतील, असे प्रतिपादन कणकवलीचे उपविभागीय पोलीस अधीक्षक विनोद कांबळे यांनी आचरे येथे बोलताना केले.
मालवण तालुका पत्रकार समिती आणि धी आचरा पीपल्स असोसिएशन संचालित न्यू इंग्लिश स्कुल आचरा येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन या उपक्रमाचा शुभारंभ मालवणचे तहसीलदार अजय पाटणे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी स्कुल कमिटीच्या अध्यक्षा नीलिमा सामंत, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर, उपाध्यक्ष
बंटी केनवडेकर, कोकण विभागीय सचिव नंदकिशोर महाजन, मालवण तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष गावडे, उपाध्यक्ष अर्जुन बापर्डेकर, सचिव कृष्णा ढोलम, सहसचिव परेश सावंत, खजिनदार सिद्धेश आचरेकर, महेश सरनाईक, पत्रकार प्रफुल्ल देसाई , पत्रकार अमित खोत , सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील, निलेश सरजोशी, मुख्याध्यापक गोपाळ परब, बंडू पाटील, राजन पांगे, कुणाल मांजरेकर, प्रशांत हिंदळेकर, सुरेश ठाकूर, आपा मालंडकर, उदय बापर्डेकर, संदीप बोडवे, नितीन आचरेकर आदी उपस्थित होते. प्रारंभी गावडे यांनी प्रास्ताविक केले.
यावेळी तहसीलदार अजय पाटणे यांनी स्पर्धा परीक्षा देण्यासाठी कोणत्याही शाखेतून पदवीधर होणे आवश्यक असते. दहावी, बारावी किंवा पदवी परीक्षेत कमी गुण मिळाले असले तरी स्पर्धा परिक्षात यश मिळू शकते. त्यासाठी विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून विद्यार्थी दशेपासूनच एकाग्रतेने अभ्यास करायला हवा. यूपीएससी, एमपीएससी सारख्या परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी सखोल ज्ञान घेणे आवश्यक असल्याचे सांगून ते म्हणाले आपल्याला प्रशासकीय अधिकारी व्हायचे यासाठी विद्यार्थ्यांनी एकाग्रतेने अभ्यास करावा असे आवाहन तहसीलदार पाटणे यांनी केले . यावेळी तोरसकर यांनी मालवण तालुका पत्रकार समितीने राबविलेल्या उपक्रमाचे कौतुक करत भविष्यात जिल्ह्यातही व्यापक स्वरूपात मार्गदर्शन वर्ग आयोजित करणार असल्याचे सांगितले.
आचरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील यांनी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांची दिलखुलासपणे उत्तरे दिली. यावेळी ज्येष्ठ पत्रकार महाजन यांनी विद्यार्थ्यांना सामान्यज्ञानसंबंधी प्रश्न विचारले. यावेळी निलेश सरजोशी, नीलिमा सावंत यांनी विचार मांडले. शेवटी आभार मुख्याध्यापक गोपाळ परब यांनी आभार मानले.कार्यक्रमाचे मधुरा माणगावकर यांनी सूत्रसंचालन केले
