विशाल परब यांच्यावर भविष्यात मोठी जबाबदारी

भाजप नेते निलेश राणे यांनी दिले संकेत

कुडाळ:विशाल परब यांना तूर्तास आमदारकी लढवायची नाही किंवा खासदारकी मी सांगितल्या नंतर ते निश्चितच लढतील. अन्यथा काय खरं नाही. पण जीव असा लावायचा माणसाने की त्याचा स्वार्थ नसेल. असे सांगत विशाल परब यांना भविष्यात खासदार किंवा आमदार करण्याचा सुतोवाच माजी खासदार निलेश राणे यांनी आज येथे केला.विशाल परब यांची ओळख संजय घोडावत ते दिल्ली पर्यत आहे.

ते देशात फिरतात परंतू त्यांनी आपल्या गावाला संस्थेला महत्व दिले आहे. त्यांचा आदर्श घेऊन कार्यकर्त्यांनी पुढील वाटचाल करावी अशा प्रामाणिक कार्यकर्त्याच्या पाठीशी मी कायम उभा आहे. विशाल परब मित्रमंडळ व भाजप सिंधुदुर्ग यांच्या माध्यमातून आज जिल्ह्यातील पाचशेहून अधिक विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी माणगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात निलेश राणे बोलत होते.यावेळेस व्यासपीठावर अध्यक्षस्थानी माजी खासदार निलेश राणे,युवा नेतृत्व तथा माणगाव हायस्कूल चे माजी विद्यार्थी विशाल परब,संस्थाध्यक्ष सगुण धुरी,सीईओ वि.न.आकेरकर,जिल्हा बॅक संचालक प्रकाश मोर्ये,दिपक नारकर,दादा साईल,संचालक चंद्रशेखर जोशी,दत्ता धुरी,महेश भिसे,सरपंच जोसेफ डाॅन्टस,उपसरपंच दत्ता कोरगावकर,श्रावण धुरी,सचिन धुरी,आनंद शिरवलकर,दादा परब,तेजस माने,आबा धडाम,राजा धुरी,मोहन सावंत,मुख्याध्यापक प्रशांत धोंड,उपमुख्याध्यापक संजय पिळणकर,पर्यवेक्षक चंद्रकांत चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळेस माजी खासदार निलेश राणे व कार्यक्रमाचे आयोजन व दानशूर व्यक्तीमत्व विशाल परब यांचा शाल श्रीफळ व मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला.यावेळेस माणगाव हायस्कूल व श्री देवी यक्षिणी विद्यालय बेनगाव च्या 1050 विद्यार्थी वर्गाला मोफत दप्तर वाटप करण्यात आले.

You cannot copy content of this page