⚡सावंतवाडी ता.२९-: कवठणी मुरडीवाडी चे माजी ग्रामपंचायत सदस्या व पोस्ट कार्यालयाच्या अल्प बचत च्या प्रतिनिधी प्रभावती आत्माराम गावकर यांचे बुधवारी रात्री 10 च्या सुमारास दुःखद निधन झाले आहे.
त्यांच्या पश्चात दोन मुलगे, एक मुली, जावई, सुना, भाऊ, भावजया, पुतणे, पुतण्या, नातवंडे असा मोठा परिवार आहे. भाजपाचे पदाधिकारी शेखर गांवकर यांच्या त्या मातोश्री होत. तसेच जि.प.च्या माजी महिला व बाल कल्याण सभापती शर्वांणी गांवकर यांच्या त्या सासू होत.
