काहीजण शहरातील सुरू असलेली अवजड वाहतूक बंद करण्याच्या मार्गावर

माजी उपनगराध्यक्ष उमाकांत वारंग यांचा आरोप:राजू बेग, दिलीप भालेकर यांच्याकडे निशाणा;व्यापाऱ्यांचा विचार करून अवजड वाहतूक बंद न करण्याची मागणी

⚡सावंतवाडी ता.२८-: येथील मोती तलावाचा केवळ फुटपाथ कोसळला असून, कोणत्याही प्रकारे रस्ता खचला नाही. काहीजण उगाचच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करून, शहरातून मोजक्या प्रमाणात सुरू असणारी वाहतूक अवजड वाहतूकीच्या नावाखाली बंद करण्याच्या मार्गावर आहेत. असा आरोप माजी उपनगराध्यक्ष उमाकांत वारंग यांनी माजी उपनगराध्यक्ष राजू बेग आणि दिलीप भालेकर यांचे नाव न घेता केला आहे. शहरातील व्यापाऱ्यांचा विचार करता येथून होणारी वाहतूक बंद करू नये, अशी मागणीही यावेळी त्यांनी यांनी केली आहे.

यावेळी ते पुढे बोलताना म्हणाले की, मुंबई गोवा महामार्ग सावंतवाडीच्या बाहेरून गेल्याने शहराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यात लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण करून काही लोक शहरात मोजक्या प्रमाणत येणारी वाहतूक देखील बंद करण्याच्या मार्गावर आहेत. एकतर वाहतूक बाहेरून होत असल्याने त्याचा फटका शहराला पर्यायाने व्यापाऱ्यांना बसू शकतो. त्यामुळे ही वाहतूक बंद करू नये असे मत त्यानी व्यक्त केले आहे.

You cannot copy content of this page