वैभववाडी पंचायत समितीच्या सहा सदस्य पदासाठी आरक्षण जाहीर…

वैभववाडी प्रतिनिधी
‌‌वैभववाडी पंचायत समितीचे सहा सदस्य पदाचे आरक्षण सोडत येथील तहसील कार्यालय सभागृहात जाहीर करण्यात आले. पंचायत समितीच्या सहा मतदारसंघाचे आरक्षण सोडत पार पडले. आरक्षण पुढीलप्रमाणे भुईबावडा – सर्वसाधारण, कोळपे नागरिकांचा मागास प्रवर्ग, कोकिसरे – सर्वसाधारण महिला, उंबर्डे – सर्वसाधारण महिला, खांबाळे – सर्वसाधारण, लोरे नं.२ सर्वसाधारण महिला अशा पद्धतीने आहे. आरक्षण सोडत प्रसंगी उपजिल्हाधिकारी आयुष कुमार सोनोणे, तहसीलदार रामदास झळके, गटविकास अधिकारी जयप्रकाश परब, नायब तहसीलदार श्रीमती कासकर आदी उपस्थित होते. व राजकीय पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

You cannot copy content of this page