Headlines

पाणीपुरवठा विभागामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची नैतिक जबाबदारी स्वीकारून सभापती प्रतीक बांदेकर यांनी राजीनामा द्यावा..

संजू परब यांची मागणी: ठराव आणि टिप्पणी वाचनावर विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये बाचाबाची ..

⚡सावंतवाडी ता.१०-:
येथील नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची नैतिक जबाबदारी स्वीकारून पाणीपुरवठा सभापती प्रतीक बांदेकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी जोरदार मागणी असे ते पार पडलेल्या नगर परिषदेच्या मासिक बैठकीत नगरसेवक तथा माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी केली. तसेच या प्रकरणात केवळ कर्मचाऱ्यांनाच बळीचा बकरा न करता या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन हे कोण दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी ही त्यांनी केली.

आपल्याला बापूसाहेब महाराजांचा वारसा लाभला असल्याने या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन याच्या मुळाशी जाऊन चौकशी केली जाईल व जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल असे आश्वासन नगराध्यक्षा श्रद्धा भोसले यांनी दिले.
नगरपरिषदेची मासिक बैठक आज लोकमान्य टिळक सभागृहात पार पडली, यावेळी शहरातील विविध विकास कामांवर चर्चा करण्यात आली व आवश्यक ठराविक घेण्यात आले. मात्र आयत्या वेळी उपस्थित करण्यात आलेल्या नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागातील भ्रष्टाचारावर जोरदार चर्चा झाली नगरसेविका ॲड सायली दुभाषी शर्वरी धारगावकर व नगरसेवक देवेंद्र टेमकर यांनी या विषयाला हात घालत झालेल्या भ्रष्टाचारा संदर्भातात मुख्याधिकारी अहवाल का देत नाहीत तसेच या विभागाचे गहाळ झालेल्या रजिस्टर संदर्भात ठराव घेऊनही अद्यापही एफ आर आय दाखल का केली जात नाही असा सवाल उपस्थित केला. यावर झालेल्या चर्चेत समर्पक उत्तर मिळत नसल्याने नगरसेवक संजू परब यांनी आक्रमक भूमिका घेत या सर्व बाबींची नैतिक जबाबदारी स्वीकारून पाणीपुरवठा सभापती श्री बांदेकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली तसेच संबंधित प्रकरणाच्या मुळाशी जाऊन जो कोणी दोषी असेल त्यांच्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे अशी मागणी केली. यावर सभापती श्री बांदेकर यांनी आपली बाजू मांडली संबंधित भ्रष्टाचाराचा प्रकार उघडता येतात यापुढे कुठलेही बिल अदा करू नये असे आदेश आपण तात्काळ दिले होते. तसेच झालेल्या चौकशीमध्ये प्रशासन काळात बजेट पेक्षा जास्त बिल अदा केली गेली असे दिसून आले. 10 झालेल्या रजिस्टर संदर्भात तक्रार दाखल करण्यासंदर्भातही आपण लेखी पत्र मुख्याधिकारी यांना दिले असल्याचे त्यांनी सांगितले. एकूणच या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता नगराध्यक्ष श्रद्धा भोसले यांनी या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
दरम्यान सभेच्या सुरुवातीलाच ठराव आणि टिप्पणी वाचनावर विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये बाचाबाची झाली यावर नगराध्यक्षांनी हस्तक्षेप करत तोंडगा काढत पुढील विषय वाचण्यास सहमती दिली. दरम्यान शहरात भटक्या कुत्र्यांना अन्न खाण्याचे प्रकार पुढे आले आहेत त्यामुळे कुत्र्यांची संख्या शहरात वाढली असून यावर निर्बंध आणण्यासाठी अशा प्रकारचे अन्न घालण्याची चार ठिकाणी नगरपालिकेकडून निश्चित करण्यात आली असून त्याच ठिकाणांमध्ये जाऊन नेमणूक केलेल्या व्यक्तीने कुत्र्यांना जेवण देणे अनिवार्य असल्याचा निर्णय घेण्यात आला त्यासाठी नियम व अटीची तरतूदही असणार असे सांगण्यात आले या चार ठिकाणांमध्ये झिरंग भाग, चिटणीस नाका परिसर, मियाॅसाब समाधी परिसर व मोरडोंगरी परिसरामध्ये जागा निश्चिती करण्यात आली आहे. मात्र मोरडोंगरी परिसर हा आपल्या प्रभागात येत असल्याने तेथील लोकांशी सहमती घेऊनच ही जागा निश्चित केली गेली आहे का असा प्रश्न नगरसेवक अजय गोंदावळे यांनी उपस्थित केला. या प्रभागातील लोकांना भटक्या कुत्र्यांचा त्रास नको असे ते म्हणाले यावर नगराध्यक्षांनी ज्यांची कोणाची तक्रार असेल त्यांनी उद्यापर्यंत यावर हरकत नोंदवण्याचे आवाहन केले.
दरम्यान नगरपालिकेच्या इंदिरा गांधी व्यापारी कॉम्प्लेक्समधील दुकान काळेधारकांना भाडाची रक्कम भरणा करण्यास मुदत मिळण्यासंदर्भात व प्रीमियम रक्कम भरण्यास सूट मिळण्यासंदर्भात पगार चर्चा करण्यात आली यावेळी नगरसेवक संजीव परब यांनी प्रीमियम रक्कम मग होऊ शकते का या संदर्भात विचार करण्यात यावा तर गाळे भाडे हे तीन टप्प्यात वसूल करण्यात यावे अशी मागणी केली यावर नगराध्यक्षांनी गाळे भाडे वसूल केल्यानंतरच प्रीमियम संदर्भात निर्णय घेऊ आपल्यापर्यंत अद्यापही एकही व्यापारी आलेला नाही त्यामुळे व्यापाऱ्यांची मागणी आल्यास यावर चर्चा करून योग्य तो निर्णय घेतला जाईल असे त्यांनी सांगितले. शासनाच्या कचरा मुक्त अभियानाच्या संकल्पनेनुसार शहरातील विविध ठिकाणी जीव्हीपी पॉईंट सुशोभीकरण करणे यावर चर्चा झाली मात्र हे काम करत असताना शहरात शिल्पकाम परिसरातील तिच्यावर मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जातो हा कचरा संपूर्ण रस्त्यावर पसरलेला असतो यावर नगरसेवक अजय गोंदावळे यांनी आवाज उठवत नाराजी व्यक्त केली अशा कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी शहरात तीन ठिकाणी लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याप्रमाणे या ठिकाणीही सीसीटीव्ही कॅमेरे बसवून संबंधितांवर मोठ्या रकमेची कारवाई करण्यात ची मागणी त्यांनी केली यावर शहरातील अन्य ठिकाणी सीसीटीव्ही बसवण्यासंदर्भात निधीची मागणी करण्यात आली असल्याचे नगराध्यक्षांकडून सगळ्यात आले निधी उपलब्ध झाल्यास शहरातील बऱ्याच ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जातील असे ते म्हणाले.

You cannot copy content of this page