Headlines

मळगावात घरगुती गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन…

⚡सावंतवाडी ता.१०-: गणेशोत्सव २०२६ निमित्त भिल्लवाडी ग्रुप व समस्त ग्रामस्थ, मळगाव यांच्या वतीने ‘मळगाव घरगुती गणपती सजावट स्पर्धा २०२६’ आयोजित करण्यात आली आहे. गावातील घराघरांतील गणपतीची आरास, कला, कल्पकता व संस्कृती सर्वांसमोर यावी, या उद्देशाने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेसाठी कोणतेही प्रवेश शुल्क आकारले जाणार नाही.

स्पर्धेतील प्रथम पारितोषिक ७ हजार १ रुपये असून ते श्री. पांडुरंग राऊळ यांच्या वतीने देण्यात येणार आहे. द्वितीय पारितोषिक ५ हजार १ रुपये श्री. विलास मळगावकर यांच्या वतीने, तर तृतीय पारितोषिक २ हजार १११ रुपये भिल्लवाडी ग्रुप, मळगाव यांच्या वतीने देण्यात येणार आहे.

गावातील जास्तीत जास्त गणेशभक्तांनी उत्स्फूर्तपणे या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क :
पांडुरंग राऊळ – ९९६७३३३१००
सचिन राऊळ – ७६६६६५६१००
सुरज राऊळ – ८४५९६३२०७५
नितेश तेली – ९६२३४६०३७६
दीपेश गावकर – ७९७७८२७४८२
सिद्धू आजगावकर – ९६२३४६०३७७

‘एक गाव… एक उत्सव… एक परिवार…’ या भावनेतून आयोजित या स्पर्धेत मळगावातील गणेशभक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page