Headlines

मुक्ताई ॲकेडमीच्या साक्षी, गार्गी, चारुल, श्रेया, लिएण्डर, चिदानंद, पार्थ यांची जिल्हास्तरीय बुदधिबळ स्पर्धेसाठी निवड…

⚡सावंतवाडी ता.१०-: सिंधुदुर्ग जिल्हा क्रिडा कार्यालय याच्यातर्फे बांदा येथे घेण्यात आलेल्या सावंतवाडी तालुकास्तरीय बुदधिबळ स्पर्धेत मुक्ताई ॲकेडमीच्या विदयार्थ्यांनी चमकदार खेळ करुन जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रवेश मिळवला. ॲकेडमीच्या साक्षी रामदूरकर, गार्गी सावंत, चारुल जाधव, श्रेया माणगावकर, सलोनी चव्हाण, लिएण्डर पिंटो, चिदानंद रेडकर, पार्थ गावकर, हर्ष राऊळ, यश सावंत, पुष्कर केळूसकर, अथर्व वेंगुर्लेकर, दर्श सावंत, गौरांग टोपले या विदयार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेतला. मागील दहा वर्षात ॲकेडमीच्या बहुतांश विदयार्थ्यांची शालेय स्पर्धेत विभाग आणि राज्य स्तरावर निवड झाली आहे. राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर यश मिळवणारी मुक्ताई ॲकेडमी ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव ॲकेडमी आहे.
राष्ट्रीय कॅरम खेळाडू साक्षी रामदूरकर हीने सलग पाच वर्षे जिल्हा स्तरावर निवडुन येण्याचा बहुमान प्राप्त केला. सतरा वर्षाखालील गटात साक्षीने पहिला क्रमांक मिळवला. आंतरराष्ट्रीय रेटेड बुदधिबळ खेळाडू गार्गी सावंत हिने चौदा वर्षाखालील गटात पहिला क्रमांक मिळवला. सलग तीन वर्षे गार्गी जिल्हा स्तरावर निवडुन येत आहे. स्पर्धेत पहिल्यांदाच सहभाग घेऊन सतरा वर्षाखालील गटात चारुल जाधवने तिसरा आणि श्रेया माणगावकरने चौथा क्रमांक मिळवला. लिएण्डर पिंटो याने चौदा वर्षाखालील गटात पहिल्यांदाच सहभाग घेऊन पहिला क्रमांक पटकावला. चिदानंद रेडकरने तिसरा आणि सतरा वर्षाखालील गटात पार्थ गावकरने चौथा क्रमांक मिळवला. या सर्व विदयार्थ्यांची कणकवली येथे होणा-या जिल्हास्तरीय बुदधिबळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे. मुक्ताई ॲकेडमीचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ प्रशिक्षक श्री.कौस्तुभ पेडणेकर सर आणि राष्ट्रीय बुदधिबळ खेळाडू आणि प्रशिक्षक बाळकृष्ण पेडणेकर यांच्या मार्गदर्शनखाली या विदयार्थ्यांनी हे यश मिळवले आहे. सर्व स्तरातुन यशस्वी विदयार्थ्यांचे कौतुक करण्यात येत आहे.

You cannot copy content of this page