Headlines

Global Maharashtra Breaking News

आजगावातील बीएसएनएल टॉवर पंधरा दिवसांपासून बंद; ग्रामस्थ हैराण…

नेटवर्कअभावी ऑनलाईन शिक्षण, शासकीय कामे ठप्प; सेवा तात्काळ सुरू न झाल्यास बीएसएनएल कार्यालयावर मोर्चा.. ⚡सावंतवाडी ता.२०-:तालुक्यातील आजगाव गावातील बीएसएनएल टॉवर गेले पंधरा दिवस बंद असल्याने गावात नेटवर्क समस्या निर्माण झाली आहे यासाठी वारंवार बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांचे लक्ष वेधूनही सेवा सुरळीत न झाल्याने ग्रामस्थ हैराण झाले आहेत, सदरची सेवा तात्काळ सुरू न केल्यास प्रसंगी ग्रामस्थांना घेऊन कार्यालयावर…

Read Full News

कृषी कार्यानुभवासाठी उद्यान महाविद्यालयाचे विद्यार्थी पाडलोसमध्ये दाखल…

⚡बांदा ता.२०-:उद्यानविद्या शिक्षणासोबत ग्रामीण जीवनाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी उद्यान महाविद्यालय, मुळदे येथील विद्यार्थ्यांचा गट कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत पाडलोस गावात दाखल झाला आहे. पुढील सहा महिने हे विद्यार्थी गावात वास्तव्यास राहून शेती, बागायती पिके, ग्रामीण विकास तसेच सामाजिक जीवनाचा अभ्यास करणार असल्याची माहिती पाडलोस उपसरपंच राजू शेटकर यांनी दिली.या कार्यक्रमात सातारा, बारामती, धाराशिव, राजस्थान, अकोला आणि…

Read Full News

वेंगुर्ला भाजपच्या दणक्यानंतर वीज वितरण मार्फत वर्किंग त्वरित सुरु…

⚡वेंगुर्ला ता.२०-: जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ व वेंगुर्ला भाजपा शिवसेना पदाधिकारी यांनी सोमवारी घेराव घालीत वीज वितरणला दिलेल्या दणक्यानंतर वेंगुर्ला वीज वितरण विभागामार्फत तालुक्यातील मान्सूनपूर्व कामास त्वरित सुरुवात केली. सोन्सुरे येथे पडलेले 5 पोल व तारा तुटून झालेले नुकसान कव्हर करीत एक दिवसात विजपुरवठा सुरळीत केला. तुळस श्री जैतीर कवळास उत्सवाच्या…

Read Full News

अनिस’च्या सिंधुदुर्गअध्यक्षपदी ॲड. राजीव बिले…

⚡कुडाळ ता.२०-: अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मुलन समितीच्या सिंधुदुर्ग अध्यक्षपदी ॲड. राजीव बिले , सचिव पदी अजित कानशिडे व जिल्हा संघटक पदी विजय चौकेकर यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रिय उपाध्यक्ष अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे रवींद्र खानविलकर व राज्य संघटक हरिभाऊ पाथोडे यांनी ही निवड केली आहे.दि 1 एप्रिल 2026 ते 31 मार्च 2027 या कालावधीसाठी अखिल…

Read Full News

तरूणानीं उद्योजकतेची कास धरावी…

अँड.नकुल पार्सॅकर:कुडाळ मध्ये नव उद्योजकांचे निवासी शिबिर संपन्न.. ⚡कुडाळ ता.२०-: नव्वदच्या दशकानंतर आपल्या देशाने डंकेल प्रस्ताव स्विकारला. खुल्या अर्थव्यवस्थेमुळे अर्थातच सरकारी नोकरीला मर्यादा आल्या. त्यानंतरच्या काळात झपाट्याने झालेल्या यांत्रिकीकरणामुळे आणि आता झालेली डिजीटल क्रांती यामुळे मनुष्यबळाची गरज कमी झाली, अशावेळी आजच्या तरूण- तरूणीनी नोकरीच्या मागे न लागता स्वयंरोजगार निर्माण केला पाहिजे. आपल्या व्यवसायातून निर्माण होणाऱ्या…

Read Full News

पर्यावरण जनजागृतीसाठी ‘सागर ते सह्याद्री, बीज अंकुरे अंकुरे’ सायकल यात्रेचे आयोजन…

विजयदुर्ग ते दोडामार्ग असा २०० कि.मी.चा प्रवास.. ⚡मालवण ता.१९-:आज पर्यावरणाची मोठी हानी होत असून सिंधुदुर्ग जिल्ह्यावर सातत्याने वादळाचे सावट निर्माण होत आहे. यंदाच्या उन्हाळ्यात नागरिकांना अभूतपूर्व उष्णतेचा त्रास सहन करावा लागला. मानव प्राण्याने आरंभलेला पर्यावरणाचा ऱ्हास हेच यामागील एकमेव कारण आहे. आपले कोकण पूर्वीसारखे हिरवेगार, शांत आणि प्रसन्न राखायचे असेल तर पर्यावरण संवर्धनाशिवाय पर्याय नाही….

Read Full News

वीज समस्येमुळे पर्यटन व्यवसायाचे कंबरडे मोडले…

वीज कंपनीच्या कारभारावर नितीन वाळके यांची टीका.. ⚡मालवण ता.१९-:मालवण शहरासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या महावितरणच्या वीज पुरवठ्याचा खेळखंडोबा सुरू आहे. सातत्याने होणारा कमी दाबाचा पुरवठा, वारंवार वीज खंडित होणे आणि कधीतरी अचानक प्रचंड दाबाने विजेचा प्रवाह येणे, या चक्रव्यूहात जिल्ह्यातील ग्राहक होरपळून निघाले आहेत. वीज समस्येमुळे स्थानिक पर्यटन व्यवसायाचे कंबरडे मोडले असून व्यापारी, हॉटेल व्यावसायिक, विद्यार्थी,…

Read Full News

मालवणमध्ये २६ मे पासून वॉटरस्पोर्ट्स आणि सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी वाहतूक बंद…

⚡मालवण ता.१९-:मालवणच्या यंदाच्या पर्यटन हंगामाचा शेवटचा टप्पा सुरु असून पावसाळी कालावधीत जलपर्यटन बंद राहणार आहे. त्यामुळे येत्या पावसाळी हंगामाच्या पार्श्वभूमीवर समुद्रातील संभाव्य धोके लक्षात घेता मालवण बंदर क्षेत्रात २६ मे २०२६ पासून सर्व प्रकारची प्रवासी जलवाहतूक आणि व्यावसायिक जलक्रीडा प्रकार पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश महाराष्ट्र सागरी मंडळाने जारी केले आहेत. हा बंदी आदेश ३१ ऑगस्ट…

Read Full News

मालवणमधील नारायण मंदिरात २४ मे पासून श्रीमद् भागवत सप्ताह सोहळा..

⚡मालवण ता.१९-:मालवण शहरातील देऊळवाडा येथील ग्रामदैवत श्री देव नारायण मंदिरात, अधिक मासानिमित्त आणि जनकल्याणार्थ श्रीमद् भागवत सप्ताह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. दि. २४ ते ३१ मे या कालावधीत हा सप्ताह सोहळा विविध धार्मिक कार्यक्रमांनी संपन्न होणार आहे. या सोहळ्या अंतर्गत दररोज सकाळी ८ ते १२ वाजेपर्यंत, श्रीमद् भागवत महापुराणाचे संस्कृतमध्ये वाचन (संहिता वाचन), श्री…

Read Full News

विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर…

आचारसंहिता भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी:जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे.. ⚡सिंधुदुर्गनगरी,ता.१९-: भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषद रायगड-तथा-रत्नागिरी-तथा सिंधुदूर्ग स्थानिक प्राधिकारी मतदार संघाकरिता निवडणूक कार्यक्रम १८ मे २०२६ रोजीपासून घोषित केला आहे. निवडणूक कार्यक्रम घोषित केल्याच्या दिनांकापासून म्हणजेच १८ मे २०२६ पासून ते निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत म्हणजेच २५ जून २०२६ पर्यंत रायगड, रत्नागिरी व सिंधुदूर्ग…

Read Full News

You cannot copy content of this page