मुक्ताई ॲकेडमीची साक्षी रामदुरकर जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेत मुलींच्या गटात विजेती…

⚡सावंतवाडी ता.१६-: कुंभवडे ग्रामस्थ संघ, मुंबई आणि शंकर महादेव सावंत ग्रामविकास संस्था, मुंबई संचालित शंकर महादेव विदयालय, कुंभवडे गुरुकुल व सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशन यांच्यातर्फे सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्पर्धा कणकवली येथील कुंभवडे गावातील शंकर महादेव विदयालयात गुरुवार दि.12 व शुक्रवार दि.13 फेब्रुवारी या दोन दिवसात घेण्यात आली. कुंभवडे गावात प्रथमच अशा भव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
या स्पर्धेत अठरा वर्षाखालील मुलींच्या गटात सावंतवाडी येथील मुक्ताई ॲकेडमीची विदयार्थिनी साक्षी रामदुरकर हीने विजेतेपद पटकावले. साक्षीने प्रत्येक फेरीत उत्कृष्ट खेळ करत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळवले. रोख रक्कम, आकर्षक चषक आणि प्रशस्तीपत्र देऊन साक्षीला गौरविण्यात आले. साक्षीने या वर्षी शालेय राज्यस्तरीय स्पर्धेचे उपविजेतेपद मिळवले आहे. मुक्ताई ॲकेडमीचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ कॅरम प्रशिक्षक श्री.कौस्तुभ पेडणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली साक्षी मागील चार वर्ष प्रशिक्षण घेत आहे. सर्व स्तरातून साक्षीचे कौतुक करण्यात येत आहे.

You cannot copy content of this page