वैश्य वाणी युवा संघटनेतर्फे कॅन्सर रुग्णालयाला देणगी…

⚡सावंतवाडी, ता.१६-: समाजोपयोगी उपक्रमांना सातत्याने प्राधान्य देत वैश्य वाणी युवा संघटना यांच्या वतीने आज कॅन्सर रुग्णांच्या उपचारासाठी आर्थिक मदतीचा हात पुढे करण्यात आला. संघटनेतर्फे कॅन्सर हॉस्पिटलला देणगी स्वरूपात रुपये १० हजारांचा धनादेश प्रदान करण्यात आला.

गरजू रुग्णांना उपचारासाठी मदत व्हावी आणि समाजात सेवाभाव वाढावा या उद्देशातून हा उपक्रम राबविण्यात आल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. पुढील काळातही अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम हाती घेण्यात येणार असल्याची ग्वाही यावेळी देण्यात आली.या देणगी उपक्रमाबद्दल विविध स्तरांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

You cannot copy content of this page