Global Maharashtra Breaking News

संततधार पावसामुळे सावंतवाडी भाजी मार्केट येथील छप्पर कोसळून नुकसान

सुदैवाने अनर्थ टाळला : नगरसेवक आनंद नेवगी यांनी दिली माहिती ⚡सावंतवाडी ता.११-: गेले काही दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे सावंतवाडी भाजी मार्केट येथील छप्पर कोसळून किरकोळ नुकसान झाले आहे. सुदैवाने त्यावेळी बाजारपेठेत कोणीही नसल्याने मोठा अनर्थ टळला आहे. ही घटना आज सकाळी घडली असून, याबाबतची माहिती माजी नगरसेवक आनंद नेवगी यांनी दिली आहे.

Read More

पाणी पुरवठा करणारे पाळणेकोंड धरण भरले

माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांची माहिती;सावंतवाडी शहर वासियांना दिलासा सावंतवाडी,ता.११ शहराला पाणीपुरवठा करणारे पाळणेकोंड धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. पाण्याची पातळी वाढल्यामुळे सर्व दरवाजे उघडण्यात आले आहेत. हे धरण काल एकादशी दिवशी पूर्ण क्षमतेने भरले असल्याची माहिती माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी दिली. दरम्यान जुलै महिन्यात पूर्ण क्षमतेने धरण भरल्याने शहरवासीयांसाठी दिलासादायक असल्याचे साळगावकर यांनी…

Read More

रोटेरियन हे मानवतेचे स्वयंसेवक- नसीरभाई बोरसादवाला

⚡मालवण ता.१०-:रोटरी क्लब ही मानवहितासाठी कार्यरत असणारी संस्था आहे. यातील प्रत्येक रोटेरियन हा आव्हान स्वीकारुन समाज मजबूत करण्यासाठी काम करत असतो. रोटरीचे कार्य चिरंतन असून प्रत्येक सदस्य हा आयुष्यभर रोटेरियन असतो. रोटरीच्या माध्यमातून काम करणारे रोटेरियन हे मानवतेचे स्वयंसेवक आहेत असे प्रतिपादन रोटरी क्लबचे डिजीई नसीरभाई बोरसादवाला यांनी येथे बोलताना केले. रोटरी क्लब ऑफ मालवणच्या…

Read More

मळेवाड जकातनाका येथील दुकानाला वादळी पावसाचा तडाखा

⚡सावंतवाडी ता.१०सहदेव राऊळ-: आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास झालेल्या जोरदार वारा, पावसाच्या तडाख्यात मळेवाड जकातनाका येथील वसंत विठ्ठल नाईक यांच्या मालकीच्या इमारतीच्या छप्परावर अचानक झाडाची भली मोठी फांदी मोडून पडली. त्यामुळे नाईक यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. या इमारतीमध्ये दुकाने असून दुपारची वेळ असल्याने सुदैवाने येथे कोणीही नव्हते. त्यामुळे मोठा अनर्थ टळला, मात्र या…

Read More

राजकीय लढाईत शिंदे गटाचाच होईल विजय

केंद्रीयमंत्री नारायण राणे यांचा विश्वास;मात्र न्यायालयाच्या निर्णयावर भाष्य करण्यास नकार मालवण (प्रतिनिधी)राज्यात सत्तेत असलेल्या शिवसेना शिंदे गटाने जे निर्णय घेतले आहेत ते कायदेशीर सल्ला घेऊनच घेतले असल्याने राजकीय लढाईत शिंदे गटाचाच विजय होईल असा ठाम विश्वास केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी व्यक्त करतानाच शिंदे गटाच्या अपात्रतेबाबत शिवसेनेने दाखल केलेल्या याचिकेबाबत उद्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर अधिक…

Read More

जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पहावी

केंद्रीयमंत्री नारायण राणे यांचे आवाहन;बारावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा भाजपने केला सन्मान मालवण (प्रतिनिधी) आपण कसे जगावे हे आपल्याला शिक्षण शिकवते. आजची मुले स्पर्धेच्या आणि अधुनिकेतच्या युगात शिक्षण घेत आहेत. आयएएस ऑफिसर, उद्योग व्यवसाय क्षेत्र यात मराठी, कोकणी, मालवणी मुले कमी दिसतात. मात्र येथील मुलांनी मोठी स्वप्ने पहावीत. स्वतःला कमी लेखू नये. जगात अशक्य असे काही…

Read More

भिमगर्जना बौद्ध मंडळाच्यावतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

सेवानिवृत्त बांधवांचाही केला सन्मान ⚡सावंतवाडी ता.१०-: भिमगर्जना बौद्ध मंडळ सावंतवाडी यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थी आणि सेवानिवृत्त कर्मचारी यांचा सत्कार समारंभ आज सावंतवाडी समाज मंदिर येथील सभागृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी मान्यवरांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी राणी पार्वती देवी हायस्कूल चे माजी…

Read More

आमदार नितेश राणेंनी घेतले श्री स्वामी समर्थांचे दर्शन

आम. नितेश राणे यांचा महेश इंगळेंच्या हस्ते सत्कार ⚡देवगड ता.१०-: भारतीय जनता पार्टीचे कणकवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांनी अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी आमदार नितेश राणे यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद,प्रतिमा देऊन…

Read More

अक्षता वाघ हीची नवोदय विद्यालयात निवड

वळीवडे नंबर एकची विद्यार्थिनी ⚡देवगड ता.१०-: जिल्हा परीषद पूर्ण प्राथमिक शाळा वळीवंडे नं.१ इयत्ता ६ ची विद्यार्थीनी अक्षता गोरखनाथ वाघ हिची जवाहर नवोदय विद्यालयात निवड झाली आहे.या यशाबद्दल शाळाव्यास्थापन समिती सदस्य, गटशिक्षणाधिकारी. प्रजापती थोरात केंद्रप्रमुख अशोक जाधव,मुख्याध्यापिका रश्मीगंधामालंडकर,सहकारी शिक्षक व पालक ,ग्रामस्थ यांचेकडून अभिनंदन करण्यात येत आहे.

Read More

माठेवाडा अंगणवाडी मुलांनी साकारली विठ्ठल रखुमाई

⚡सावंतवाडी ता.१०-: सावंतवाडी माठेवाडा येथील सुधाताई वामनराव कामत जिल्हा परिषद शाळा नंबर दोन मधील अंगणवाडी क्रमांक 66 च्या तीन ते पाच वर्षाच्या बच्चे कंपनीने आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल रखुमाई साकार केली जणू या अंगणवाडीमध्येपांडुरंगासोबत पंढरी अवतरली होती आज रविवारी आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरीच्या पांडुरंग आणि रखुमाई सह वारकऱ्यांची पालखी,दिंडी पताका, या बच्चे कंपनीने साकारली…

Read More
You cannot copy content of this page