मनसे विद्यार्थी सेनेच्यावतीने सावंतवाडी आगारात धडक

बस डेपो मॅनेजर बोधे यांना घेराव घालत विद्यार्थ्याच्या विविध प्रश्नावर विचारण्यात आला जाब

⚡सावंतवाडी ता.३०सहदेव राऊळ- : मनसे विद्यार्थी सेनेच्यावतीने आज सावंतवाडी आगारात धडक देण्यात आली. यावेळी सावंतवाडी बस डेपो मॅनेजर बोधे यांना घेराव घालत विद्यार्थ्याच्या विविध प्रश्नावर जाब विचारण्यात आला.
लांबच्या बस वेळेवर लागत नसल्याने त्याचा मुलांना मोठ्या प्रमाणात ञास होत आहे. मात्र विचारायला गेले असता दरवेळी वेगवेगळी उत्तर मिळतात. तसेच प्रवास पास तिकीटघर येथे मोठ्या प्रमाणात मनमानी कारभार होत असल्याचा सवाल यावेळी मनसेच्यावतीने उपस्थित करण्यात आला. ज्या कर्मचाऱ्यांना विचारायला गेले असता मुलांना उध्दट उत्तरे दिली जातात. याचाही सावंतवाडी बस डेपो मॅनेजर बोधे यांना जाब विचारण्यात आला. लवकरात लवकर अशा मनमानी वृतीच्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करावी अन्यथा तर सर्व मुलांना घेऊन मनसे घेराव घालून जाब विचारणार आहे, वेळ पडल्यास विद्यार्थानाच घेऊन मोठ्या प्रमाणात आंदोलन करणार असल्याचा इशाराही मनसेचावतीने देण्यात आला. यावेळी विद्यार्थी सेना जिल्हाअध्यक्ष सुधिर राऊळ, सावंतवाडी तालुध्यक्ष गुरूदास गंवडे, विद्यार्थीसेना शहराध्यक्ष केतन सावंत, विद्यार्थी सेना उपशहराध्यक्ष प्रविण गवस, विभाग अध्यक्ष पांडूरंग बुगडे, विद्यार्थी सेना काॅलेज युनिट अध्यक्ष साहील तळकटकर, नेमळे शाखाध्यक्ष बाबुराव राऊळ, मळगाव शाखाध्यक्ष राकेश परब, चिन्मय नाडकर्णी व आरोंदा, तळवणे, बांदा, आंबोली, केसरी, पारपोलीतील काॅलेज विद्यार्थी उपस्थित होते.

You cannot copy content of this page