राष्ट्रवादी महिला आघाडीच्या अर्चना घारे परब यांची मागणी
बांदा/प्रतिनिधी
बांदा शहरात निमजगा येथे शाळकरी मुलाचा अपहरणाचा झालेला प्रयत्न दुर्दैवी आहे. शाळा भरण्याच्या व सुटण्याच्या वेळेत पोलीस पेट्रोलिंग वाढवावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोकण विभाग महिला आघाडी अध्यक्षा अध्यक्षा सौ. अर्चना घारे परब यांनी बांदा सहाय्यक पोलीस निरीक्षक शामराव काळे यांच्याकडे केली.
बांदा दाणोली मार्गावर शाळकरी मुलाचा अपहरणाचा प्रयत्न झाल्याचा प्रकार आज उघडकीस आला. या प्रकाराने शहरासह जिल्हाभरात खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर अर्चना घारे परब यांनी तातडीने बांदा सहाय्यक पोलीस निरीक्षकांची भेट घेतली. शहरासह अन्य ग्रामीण भागातही पेट्रोलिंग वाढविण्याची मागणी केली. शहरात आजपासूनच पेट्रोलिंग करण्यात येईल असे निरीक्षक काळे यांनी स्पष्ट केले. पोलीस सर्वतोपरी सहकार्य करतीलच, त्याचबरोबर पालकांनीही काळजी घ्यावी. कोणी संशयास्पद फिरत असल्यास पोलीसांना तात्काळ माहिती द्यावी असे आवाहन त्यांनी केले. यावेळी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलीक दळवी, रत्नागिरी निरीक्षक सौ. दर्शना बाबर-देसाई, देवेंद्र टेमकर, हिदायतुला खान, प्रशांत पांगम, राजेश विर्नोडकर, आसिफ शेख, गौरांग शेर्लेकर आदी उपस्थित होते.
फोटो:-
बांदा पोलीस निरीक्षक शामराव काळे यांच्याशी चर्चा करताना सौ. अर्चना घारे-परब. सोबत पुंडलिक दळवी व इतर. (छायाचित्र- निलेश मोरजकर)
