राष्ट्रवादीचा जल्लोष : अमित सामंत, अर्चना घारेनी केले स्वागत
बांदा ता.०१-: माजी केंद्रीय मंत्री राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे बांदा येथे नुकतेच आगमन झाले. कट्टा कॉर्नर येथे राष्ट्रवादीतर्फे त्यांचे स्वागत करण्यात आले. ज़िल्हाध्यक्ष अमित सामंत, अर्चना घारे परब, तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
वेंगुर्ला येथे बॅ. नाथ पै जन्मशताब्दी सोहळ्यात ते सहभागी होणार आहेत. तसेच पक्षांतर्गत विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार असून मार्गदर्शन करणार आहेत.
