Global Maharashtra Breaking News

मच्छीमारांनी अलर्ट राहत संशयास्पद हालचालीवर लक्ष ठेवावा

मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रमात आवाहन ⚡मालवण ता.०४-: भारतीय नौदलाच्या सामूदायिक संपर्क कार्यक्रमअंतर्गत सागरी सुरक्षेबाबत मच्छिमारांनी काळजी घेत समुद्रात कोणत्याही संशयास्पद हालचाली आढळून आल्यास अलर्ट राहून सुरक्षा यंत्रणाना माहिती द्यावी, असे आवाहन नौदल, कोस्टगार्ड, पोलीस व मत्स्य अधिकाऱ्यांनी दांडी मालवण येथील मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण केंद्रात आयोजित मार्गदर्शन कार्यक्रमात केले. नौदल, कोस्टगार्ड, मालवण पोलिस व मत्स्यव्यवसाय विभाग…

Read More

सिंधुदुर्ग सहकारी मुंबई बँकेची लवकरच सिंधुदुर्गात शाखा

नूतन अध्यक्ष म्हणून हरिष परब यांची निवड;संचालक श्रीकृष्ण ऊर्फ दीपक परब यांची माहिती मालवण (प्रतिनिधी) सिंधुदुर्ग सहकारी बँक लि. मुंबई या बँकेच्या २०२२- २३ ते २०२६- २७ या कालावधीसाठी संचालक मंडळाची बिनविरोध निवड करण्यात आली असून अध्यक्षपदी हरिष बाळकृष्ण परब (देवगड) यांची निवड करण्यात आली आहे. मुंबईत कार्यरत असणाऱ्या या बँकेची शाखा लवकरच सिंधुदुर्ग जिल्ह्यातही…

Read More

भरड नाका येथे ७ रोजी नारळ लढविणे स्पर्धा

दत्तमंदिर भरड मित्रमंडळाचे आयोजन मालवण (प्रतिनिधी) मालवण येथील दत्त मंदिर भरड मित्रमंडळ यांच्या वतीने दि. ७ ऑगस्ट रोजी सकाळी ९.३० वाजता दत्त मंदिर भरड येथे सिंधुदुर्ग जिल्हा मर्यादित नारळ लढविणे स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी कोणतेही प्रवेश शुल्क नाही. पहिल्या ३३ स्पर्धकांना स्पर्धेत प्राधान्य दिले जाणार आहे. स्पर्धेतील विजेत्यास रु ५,५५५ चषक व…

Read More

सावंतवाडी शहरातच मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल होणार!

लखम राजे भोसले : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दर्शवली सहमती ⚡सावंतवाडी ता.०४-: सावंतवाडी शहरातच मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल होणार असल्याचे सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल साठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहमती दर्शवली असून त्यांनी तसा शब्द दिला आहे असे सांगितले. बाजारभावापेक्षा जास्त या जमिनीचे मूल्य देण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी मान्यता…

Read More

आदित्य ठाकरे यांच्या सभेला अपेक्षित गर्दी नाही

तर शिंदे गटाचा प्रभाव दिसला नाही;भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांची टीका सावंतवाडीराज्यात घडलेल्या राजकीय घडामोडीनंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत शिंदे गट उघडपणे कुठेच प्रभावी दिसला नाही तर शिवसेनेचे आदित्य ठाकरे हे राज्याचे आहेत मात्र त्यांची सावंतवाडीतील सभा पाहता ज्या तुलनेत पूर्वी जी शिवसेना बघितली ती दिसून आली नसल्याचे भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी सांगितले. तर राज्यात…

Read More

श्री देव काशीविश्वेश्वर मंदिरात श्रावण महिन्यातील अखंड हरिनाम सप्ताहाला सुरुवात

कणकवली 4 ऑगस्ट (प्0 कणकवली शहरातीलश्री देव काशीविश्वेश्वर मंदिरात श्रावण महिन्यातील अखंड हरिनाम सप्ताहाला गुरुवारी विठ्ठल नामाच्या अभंगांनी व टाळघोषात प्रारंभ करण्यात आला. सप्ताहाच्यानिमित्ताने मंदिरात घटस्थापना करण्यात आली. त्यानंतर ब्रम्हवृदांच्याहस्ते विधिवत पूजा करत गाऱ्हाणे घातले. मंदिर परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली असून घटस्थापनेस्थळी फुलाची सजावट करण्यात आली आहे. यावेळी विविध पारांचे प्रमुख, मानकरी तसेच भाविक,…

Read More

केंद्रीय मंत्री अजयकुमार मिश्रा १० ते १३ ऑगस्ट रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर…

राजन तेली यांची माहिती; १३ ऑगस्ट रोजी सावंतवाडीत कार्यकर्त्यांना करणार मार्गदर्शन ⚡सावंतवाडी ता.०४-: केंद्रीय मंत्री अजय कुमार मिश्रा हे १० ते १३, रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून लोकसभाप्रवास योजने अंतर्गत ते प्रवास करणार असल्याची माहिती भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान १३ रोजी ते सावंतवाडी येथे पदाधिकाऱ्यांसोबत संवाद…

Read More

बांदा येथील आरटीओ चेकपोस्ट लवकरच कार्यरत

ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांचा दुजोरा बांदा/प्रतिनिधीगेली १५ वर्षे विविध कारणांनी वादाच्या भोवऱ्यात सापडलेला उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचा बांदा सटमटवाडी येथीलसीमा तपासणी नाका लवकरच सुरु करण्यात येणार असून त्यांदृष्टीने हालचाली सुरु करण्यात आल्या आहेत. याला येथे कार्यरत असलेल्या ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे. गेले अनेक वर्षे विविध कारणांनी हा तपासणी नाका वादात सापडला होता.या नाक्यावर आरटीओ, पोलीस,…

Read More

दारु वाहतूक प्रकरणी कोल्हापूरचे दोघे तरुण ताब्यात

बांदा पोलीसांची कारवाई ⚡बांदा ता.०४-: बांदा – पत्रादेवी जुन्या महामार्गावर रामनगर येथे गोव्यातून कोल्हापूरकडे होणार्‍या बेकायदा दारु वाहतुकी विरोधात बांदा पोलीसांनी आज सकाळी कारवाई केली. या कारवाईत ६९ हजार ५५२ रुपयांच्या दारुसह दारु वाहतूक करण्यासाठी वापरलेली सुमारे दीड लाख रुपयांची कार असा एकूण २ लाख १९ हजार ५५२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी दीपक…

Read More

हर घर तिरंगासाठी पोस्टाचा पुढाकार

ऑफलाईन व ऑनलाईन तिरंगा विक्रीसाठी उपलब्ध;अधीक्षक जी जनार्दन रेड्डी यांची माहिती सिंधुदुर्गनगरी ता ०४भारतीय डाक विभागामार्फत ” हर घर तिरंगा ” अभियान राबविले जात आहे. जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकास या अभियानात सहभागी होता यावे यासाठी सिंधुदुर्ग विभागातील प्रत्येक पोस्ट ऑफिसमध्ये राष्ट्रध्वज विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यांची नाममात्र फी २५ रुपये एवढी आहे. तसेच डाक…

Read More
You cannot copy content of this page