वैभववाडीतील सेवा सोसायट्या परतफेडीत अव्वल स्थानी

जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी

वैभववाडी संजय शेळके
     वैभववाडी तालुक्यातील सेवा सोसायट्यांनी परत फेडीच्या बाबतीत जिल्ह्यात अव्वल स्थानी आहे.  तालुक्याची उलाढाल १० कोटीवरुन २० कोटी रुपयांपर्यत वाढवली पाहीजे. जिल्ह्यात वैभववाडी तालुका रोल माॕडेल म्हणून उभा राहील. असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा बॕक अध्यक्ष मनिष दळवी यांनी केले.
     वैभववाडी तालुक्यातील २५ पैकी २३ सोसायट्यांनी १०० टक्के कर्ज फेड केल्याबद्दल त्यांच्या चेअरमन, संचालक व सचिवांचा शाल, श्रीफळ, प्रमाणपत्र दऊन सन्मान करण्यात आला. यावेळी  संचालक दिलीप रावराणे, प्रज्ञा ढवण, भाजपा तालुकाध्यक्ष नासीर काझी, भालचंद्र साठे, अरविंद रावराणे,सुधीर नकाशे,समीर सावंत, सज्जनकाका रावराणे, सिमा नानिवडेकर, अंबाजी हुंबे, सर व्यवस्थापक प्रमोद गावडे, आदी उपस्थित होते.
   यावेळी बोलताना अध्यक्ष दळवी यांनी वैभववाडी तालुक्यातील सोसायट्यांचे व शेतकऱ्यांचे कौतुक केले. वैभववाडी तालुक्यात ऊस उत्पादन वाढत आहे. सिंचन क्षेत्रात वाढ होत असल्यामुळे ऊस उत्पादनाबरोबरच येथील शेतकऱ्यांनी दुध उत्पादनाकडे वळले पाहीजे. सेवा सोसायट्यांच्या माध्यमातून दुग्ध व्यवसाय , शेती पुरक छोटे उदयोग उभारुन शेतकऱ्यांना आर्थिक सक्षम करण्यासाठी सोसायट्यांनी काम केले पाहीजे. शेतकरी व सोसायट्यांनी हातात हात घालून काम केले पाहीजे. यासाठी जिल्हा बॕंक सर्वतोपरी सहकार्य करील असे दळवी यांनी सांगितले. विकास संस्था सक्षम करण्यासाठी जिल्हा बॕंक नेहमीच आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. यावेळी संस्था सक्षमीकरण करण्यासाठी संचालक सचिव यांनी सूचना केल्या उंबर्डे सरपंच बोबडे यांनी घरदुरुस्ती व छोटे व्यवसायीक यांना छोटी कर्ज उपलब्ध करुन दया. तसेच सात बारा तील सर्व सहहिस्सेदारांच्या संमती ऐवजी हमीपञ घेण्यात यावे. अशी सूचना केली. त्याचबरोबर अनेक संचालक व सचिवांनी सूचना मांडल्या. त्या सर्व सूचनांवर आपल्या भाषणातून अध्यक्ष दळवी यांनी उत्तर दिले.

फोटो-
१०० टक्के कर्ज वसुली करणाऱ्या आखवणे सोसायटी चेअरमन, संचालक , सचिव यांचा सत्कार करतांना अध्यक्ष मनिष दळवी.
छाया- संजय शेळके वैभववाडी

You cannot copy content of this page