माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी वेधले आमदार जीत आरोलकर यांचे लक्ष
⚡बांदा ता.१२-: सावंतवाडीतील नागरिकांना गोवा येथील जी एम् सी रुग्णालयात सुविधा मिळावी यासाठी सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी आज गोवा पेडणे येथील आमदार जीत आरोलकर यांची भेट घेतली असून, त्याचे लक्ष वेधले आहे. यावेळी आमदार जीत आरोलकर यांनी त्यांना याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला असून, लवकरच यावर तोडगा काढू असे आश्वासन दिले आहे.
आज भाजपचे युवा नेते विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त पेडणे चे आमदार जीत आरोलकर हे सिंधुदुर्गात आले असताना संजू परब यांनी त्यांची बांदा येथे भेट घेतली होती.
यावेळी त्यांच्यासोबत बांदा सरपंच अक्रम खान, संदीप बांदेकर, गुरुनाथ सावंत, ज्ञानेश्वर सावंत आदी उपस्थित होते.
