सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक असोसिएशनच्या मालवण तालुकाध्यक्षपदी विजय चौकेकर

⚡मालवण ता.१२-; सिंधुदुर्ग जिल्हा सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक असोसिएशन शाखा मालवणची सर्वसाधारण सभा अध्यक्ष श्री. उत्तम कदम यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. या सभेमध्ये पुढील तीन वर्षासाठी नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली यामध्ये सर्वानुमते अध्यक्ष म्हणून श्री. विजय रोहिदास चौकेकर व सचिव म्हणून श्रीम. रुपाली रजनीकांत पेंडूरकर तर खजीनदार म्हणून सुरेश काशीराम चव्हाण यांची निवड करण्यात आली.

तसेच कार्यकारिणी मध्ये सदस्य म्हणून दाजी भानुदास तळगावकर, जयश्री श्रीनिवास हडकर, शादिबावी शब्बीर शेख, विशाखा विजय तारी, रमेश मोहन आचरेकर, प्रकाश काशिनाथ चव्हाण, श्रीकृष्ण अर्जुन पाडगावकर, सदाशिव लक्ष्मण गावडे, नरेश यशवंत पालव यांची निवड करण्यात आली.

यावेळी जिल्हा सदस्य श्री. कृष्णा पाताडे व श्री. प्रताप बागवे तसेच मालवण तालुक्यातील बहुसंख्य सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक उपस्थित होते. नूतन कार्यकारिणीचे जिल्हा अध्यक्ष श्री. सावळाराम अणावकर व जिल्हा सचिव श्री. सुंदर पारकर यांनी अभिनंदन केले आहे.

You cannot copy content of this page