⚡मालवण ता.१२-: मालवण मधील युवा सामाजिक कार्यकर्ते सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर मित्रमंडळ आणि भवानी मित्रमंडळ गवंडीवाडा यांच्यावतीने महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या पैठणी स्पर्धेत मालवण सोमवार पेठ येथील सौ. वैष्णवी किर यांनी विजेतेपद मिळवत मानाची पैठणी पटकावली.
मालवण गवंडी वाडा येथील भवानी मंदिरातील धार्मिक कार्यक्रमाच्या निमित्ताने मालवणचे युवा सामाजिक कार्यकर्ते सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर मित्रमंडळ आणि भवानी मित्रमंडळ गवंडीवाडा यांच्यावतीने महिलांसाठी पैठणी स्पर्धा तर १५ वर्षाखालील मुलांसाठी फनी गेम्स स्पर्धा घेण्यात आली या दोन्ही स्पर्धेला स्पर्धकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला
पैठणी स्पर्धेत मालवण सोमवार पेठ येथील सौ. वैष्णवी किर यांनी विजेतेपद मिळवत मानाची पैठणी पटकावली तर द्वितीय क्रमांक सौ. विद्या परुळेकर व तृतीय क्रमांक सौ. रसिका तळाशीलकर यांनी मिळविला. तसेच यानिमित्त लहान मुलांसाठी आयोजित फनी गेम्स स्पर्धेत प्रथम – रितू किर, द्वितीय- दीप कारेकर, तृतीय- सक्षम मंडलिक यांनी यश मिळविले. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ माजी नगरसेविका शर्वरी पाटकर, सौ संध्या परुळेकर, चित्रा हरमलकर, युवा सामाजिक कार्यकर्ते सौरभ ताम्हणकर , निषय पालेकर, विकास पांचाळ,चंद्रकांत मयेकर,राकेश सावंत, ललित चव्हाण आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी पैठणी विजेत्या सौ. वैष्णवी किर यांच्यासह इतर विजेत्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय शिंदे यांनी केले
