वेंगुर्ले येथे भव्य मत्स्य महोत्सव भरविणार

भाजप युवा नेते विशाल परब यांची घोषणा

⚡वेंगुर्ले ता.१२-: माझ्या वाढदिवसानिमित्त माझ्या सहकाऱ्यांनी , भाजप पक्षाने जे कार्यक्रम आयोजित केले ते मी कधीच विसरू शकत नाही. यावर्षी माझ्या सहकाऱ्यांनी माझ्या वाढदिवसानिमित्त आठ दिवस गोर गरीब जनतेसाठी कार्यक्रम करण्याचे ठरवले होते. त्या प्रमाणेच ते होत आहेत. मी 65 कातकरी मुलांना दत्तक घेतले असून, हा माझ्या जीवनातील सगळ्यात मोठा क्षण आहे. शंभर रुपये कमवले तर त्यातील दहा रुपये सर्वसामान्य जनतेसाठी खर्च करावेत. हा गुण मी माजी खासदार निलेश राणे यांच्या कडून शिकलो आहे. माझ्या वाढदिवसानिमित्त 15 ऑक्टोंबरला होणाऱ्या अभिष्टचिंतन कार्यक्रमास मी माजी खासदार निलेश राणे आणि सिंधुदुर्गचे माजी पालकमंत्री उदय सामंत यांना उपस्थित राहण्याची विनंती केली असून, दोन्ही नेत्यांनी ती विनंती मान्य केली आहे. या दिगज्ज दोन्ही नेत्यांना एकाच मंचावर आणण्याचा योग मला आणता आला याचा मला फार आनंद आहे. असे मत विशाल परब यांनी व्यक्त केले.

यावेळी त्यांनी भविष्यात वेंगुर्ला येथे न भूतो न भविष्यती असा सगळ्यात मोठा मत्स्य महोत्सव आयोजित करण्याचा आपला मानस असल्याचे मत व्यक्त करताना त्यानी वेंगुर्ला येथे येत्या काळात भव्यदिव्य मत्स्य महोत्सव होणार असल्याची घोषणा केली आहे.

You cannot copy content of this page