आरवली वैद्यकीय आणि संशोधन केंद्राला डॉ सुभाष रेगे यांच्याकडून तीन लाखाचे साहित्य
दंत चिकित्सेसाठी कॉम्प्युटराईज चेअर केली सुपूर्द;अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या डॉ रेगे यांचे होतेय अभिनंदन वेंगुर्ला प्रतिनिधी- अमेरिका येथे वास्तव्यास असलेले डॉ. सुभाष रेगे यांनी सुमारे ३ लाख किमतीची दंत चिकित्सेसाठी आवश्यक असलेली कॉम्प्युटराईज्ड चेअर आरवली येथील आरवली वैद्यकीय आणि संशोधन केंद्रामध्ये सुपूर्द केली आहे. याचा शुभारंभ २२ ऑक्टोबरला धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर करण्यात आला.
