जन्माष्टमीनिमित्त सावंतवाडीत विविध ठिकाणी भेट; भक्तिमय वातावरण..
⚡सावंतवाडी, ता.०४-: जन्माष्टमीनिमित्त भाजप युवा नेते विशालजी परब यांनी सावंतवाडी शहरातील विविध ठिकाणी भेट देत श्रीकृष्णाचे दर्शन घेतले. ‘गोविंदा’च्या जयघोषात शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असताना परब यांनी भाविकांसोबत जन्माष्टमी उत्सवात सहभाग घेतला.
यावेळी त्यांनी सावंतवाडी येथील पुरातन मुरलीधर मंदिरात जाऊन श्रीकृष्णाचे दर्शन घेतले. तसेच शहर मंडल अध्यक्ष तथा आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर, क्रीडा सभापती आनंद नेवगी, ओबीसी मंडल अध्यक्ष धिरेंद्र म्हापसेकर आणि नगरपालिका आरोग्य अधिकारी दीपक म्हापसेकर यांच्या निवासस्थानी भेट देऊन श्रीकृष्णाचे दर्शन घेतले.
जन्माष्टमीनिमित्त शहरातील विविध मंदिरांमध्ये तसेच सार्वजनिक ठिकाणी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या उत्सवामुळे सावंतवाडी शहरात दिवसभर भक्तिमय वातावरण पाहायला मिळाले.यावेळी केतन आजगांवकर, श्रीकांत राजाध्यक्ष आदी उपस्थित होते.
