आरवली वैद्यकीय आणि संशोधन केंद्राला डॉ सुभाष रेगे यांच्याकडून तीन लाखाचे साहित्य

दंत चिकित्सेसाठी कॉम्प्युटराईज चेअर केली सुपूर्द;अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या डॉ रेगे यांचे होतेय अभिनंदन

वेंगुर्ला प्रतिनिधी- अमेरिका येथे वास्तव्यास असलेले डॉ. सुभाष रेगे यांनी सुमारे ३ लाख किमतीची दंत चिकित्सेसाठी आवश्यक असलेली कॉम्प्युटराईज्ड चेअर आरवली येथील आरवली वैद्यकीय आणि संशोधन केंद्रामध्ये सुपूर्द केली आहे. याचा शुभारंभ २२ ऑक्टोबरला धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर करण्यात आला.

  शुभारंभप्रसंगी दंततज्ज्ञ डॉ.महेश पेडणेकर, डॉ.डी.टी.शिवशरण, सुधाकर राणे, एकनाथ केरकर, यशवंत फटनाईक व संस्थेचे कर्मचारी उपस्थित होते. कॉम्प्युटराईज्ड चेअरही अद्ययावत वैशिष्ट्यांनी बनविलेली आहे. गरजूंनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच रुग्णांना आवश्यक अशा या देणगीबद्दल आरवली वैद्यकीय आणि संशोधन केंद्रातर्फे डॉ.सुभाष रेगे यांचे आभार मानले आहे.
You cannot copy content of this page