⚡मालवण ता.२३-: जास्तीत जास्त गाबित समाज बांधवांपर्यंत पोहोचून समाजाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी ‘आम्ही गाबित’ अभियान राबविण्याचा निर्णय मालवण तालुका गाबित समाज कार्यकारिणीने घेतला आहे. पुढील सहा महिने विविध उपक्रम राबवून हे अभियान यशस्वी करण्याचा निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आला.
येणारा दिवाळी नववर्ष आणि स्वागताच्या निमित्ताने मालवण तालुका गाबित समाज कार्यकारिणीची सभा गाबित समाज नागरी सहकारी पतसंस्थेच्या कार्यालयात झाली. यावेळी तालुकाध्यक्ष डॉ. प्रमोद कोळंबकर, आचरेकर, उपाध्यक्षा अन्वेषा खजिनदार मिथुन मालंडकर, सदस्य भाऊ मोरजे, पवनकुमार पराडकर, दादा वाघ, दिक्षा ढोके, पूजा सरकारे, सेजल परब, संतोष ढोके, नरेश हुले, सल्लागार महेश जुवाटकर आदी उपस्थित होते.
मालवणात गाबित समाज भवन उभारण्याचा संकल्प विद्यमान कार्यकारिणीने केला आहे. त्यादृष्टीने आगामी दिवाळी, नववर्ष स्वागत ते गुढी पाडव्यापर्यंतच्या कालावधीत विविध उपक्रम हाती घेण्याचे नियोजन बैठकीत करण्यात आले.
