तळेरे येथे रुग्णवाहिकेचे लोकार्पण 

बाजारपेठ मित्रमंडळाचा सामाजिक उपक्रम

⚡कणकवली ता.२३-: तळेरे येथील बाजारपेठ मित्रमंडळाच्या वतीने रुग्णवाहिकेचे लोकार्पण डॉ. प्रकाश यशवंत बावधनकर यांच्या हस्ते करण्यात आले. या मित्र मंडळाच्या माध्यमातून अनेक सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबविले जातात. 

कोरोना काळात आणि इतरवेळी देखील  रुग्णवाहिकेअभावी झालेली गैरसोय लक्षात घेता, तळेरे पंचक्रोशीत रुग्णवाहिकेची आवश्यकता होती. तळेरे दशक्रोशीत रुग्णवाहिकेअभावी इतर ठिकाणच्या रुग्णवाहिकेवर अवलंबून रहावे लागत होते. त्यामुळे रुग्णाला पडवे, गोवा, कोल्हापुर अथवा मुंबईला नेताना खुप अडचणी यायच्या. 

ही गैरसोय लक्षात घेता बाजारपेठ मित्र मंडळाने रुग्णवाहिका घेऊन मोठा सामाजिक उपक्रम यशस्वी केला. या रुग्णवाहीकेचे लोकार्पण तळेरे येथील प्रथितयश डॉ. प्रकाश बावधनकर यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी डॉ. मिलिंद कुलकर्णी, सचिन पावसकर, तळेरे व्यापारी संघटनेचे अध्यक्ष राजू जठार, तळेरे वाचनालयाचे अध्यक्ष विनय पावसकर, उदय तळेकर, शशांक तळेकर, जिल्हा परिषद सदस्य रवींद्र जठार, कणकवली माजी सभापती दिलीप तळेकर, तळेरे सरपंच साक्षी सुर्वे, उपसरपंच दिनेश मुद्रस, नाना शेट्ये, बाबू राणे, दारुम सरपंच सुनिँद्र सावंत आणि बाजारपेठ मित्रमंडळाचे सर्व सभासद उपस्थित होते. 

You cannot copy content of this page