जनतेच्या कल्याणासाठी आमच्या सरकारचा प्रयत्न

परंतु आम्हाला चिथवत राजकारणात गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न;शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचा हल्लाबोल

सावंतवाडी : दिवाळी गोड करण्याच काम शिंदे-फडणवीस सरकारन केल आहे. जनतेच्या कामांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आमचा भर आहे. मात्र, आम्हाला चिथवण्याचा, राजकारणात गुंतवण्याचा प्रयत्न केला जात आहे. याला आम्ही दाद देणार नाही. सत्य एक ना एक दिवस समोर येईलच. एकाचवेळी असं उत्तर देऊ की यापुढे हिंमत होणार नाही असा जोरदार हल्लाबोल मंत्री दीपक केसरकर यांनी केलाय.

दरम्यान, शिक्षण खात्यात आमुलाग्र बदल येत्या काळात होणार असून हुशार मुलांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या सिंधुदुर्गतील मुलांच्या विकासासाठी अधिक भर देणार आहे. आनंदाच्या शिदा वाटपाच्यावेळी ऑनलाईनची अडचण ठरत असल्याचे समजताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑफलाईनच्या माध्यमातून ताबडतोब शिदा वाटप करायला लावलं. लोक सुखी व्हावी हा आमचा मुख्य हेतू आहे. बाळासाहेबांच्या शिवसेनेचे आमदार हे भाजपच्या संपर्कातच असतात, त्यामुळे कोण काही लिहीत किंवा बोलत याला महत्त्व नाही असा टोला उद्धव ठाकरे गटला त्यांनी हाणला. तर उद्धव ठाकरे पक्षासाठी बाहेर पडत होते. आज जनतेसाठी बाहेर पडले याचा आनंद आहे असा मिश्किल टोला शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी लगावला आहे.

You cannot copy content of this page