वेंगुर्ला
वेंगुर्ला तालुक्यातील वजराट ग्रामपंचायत कार्यालय येथे शुक्रवार दि. ४ सप्टेंबर रोजी येथे जल महोत्सव कार्यक्रम संपन्न झाला. वजराट ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील वजराट व देवसू या दोन गावांचा समावेश या महोत्सवात करण्यात आला आहे.
या जल महोत्सवाच्या कार्यक्रमास जि. प. शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ, वेंगुर्ला पं. स. सभापती शंकर घारे, तुळस जि. प. सदस्य सुजाता पडवळ, तुळस पं. स. सदस्य सुचिता वजराटकर, आडेली पं.स. सदस्य नितीन मांजरेकर, वजराट ग्रा. पं. सरपंच अनन्या आनंद पुराणिक, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, सहाय्यक
गटविकास अधिकारी दिनेश पाटकर, ग्रामीण पाणीपुरवठा उपअभियंता प्रफुल्लकुमार शिंदे, कृषी विस्तार अधिकारी प्रशांत चव्हाण, माजी सरपंच व गावप्रमुख सुर्यकांत परब, अ.बा. परब, श्री गिरेश्वर सोसायटीचे चेअरमन
मनोहर परब,
ग्रामसेवक प्रविण भोई,
उपसरपंच दिपिका राणे, सदस्य शामसुंदर पेडणेकर, प्रविण कांदे, नम्रता देसाई, प्रियांका केरकर, रसिका मेस्त्री, चेतन नाईक, नयना धुरी, नामदेव कांदे, श्री. वळवी (पाणी पुरवठा विभाग पंचायत समिती),
ग्रा.पं. कर्मचारी
प्रविण गावडे, पूर्वा कांदे, गौरव मुंजी, जीवन वेंगुर्लेकर, चंद्रकांत राणे तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी
मान्यवरांच्या हस्ते जलपूजन, जल अपर्ण, जल बंधन, जल संवर्धन, जल शृंगार तसेच जल प्रतिज्ञा घेण्यात आली.
वजराट शाळा नं १ च्या मुलांनी ईशस्तवन, स्वागत गीत सादर केले. यावेळी
आरोग्य अधिकारी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, प्राथमिक शाळेचे शिक्षक वृंद, महिला बचतगट प्रतिनिधी आदी उपस्थित होते. यावेळी पाणी कर्मचारी गौरव मुंजी, जिवन वेंगुर्लेकर व चंद्रकांत राणे यांचा सन्मान करण्यात आला.
वजराट ग्रामपंचायत कार्यालय येथे “जल दिन” कार्यक्रम संपन्न
