⚡सावंतवाडी ता.०५-: तळवडे येथील ब्लूमिंग बड्स प्री-प्रायमरी स्कूलमध्ये गोकुळाष्टमी व दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. यावेळी शाळेतील चिमुकल्यांनी श्रीकृष्ण व राधेचा वेश परिधान करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
शाळेच्या आवाराला आकर्षक सजावटीद्वारे गोकुळाचे स्वरूप देण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी श्रीकृष्णाच्या जीवनावर आधारित विविध नृत्य व गीते सादर केली. त्यामुळे संपूर्ण शाळेच्या परिसरात भक्तिमय आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरली ती चिमुकल्यांनी रचलेली दहीहंडी. ‘गोविंदा आला रे आला’च्या जयघोषात मुलांनी एकमेकांच्या खांद्यावर उभे राहून दहीहंडी फोडली. यावेळी विद्यार्थ्यांसह शिक्षकांमध्येही उत्साहाचे वातावरण होते.
याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका तसेच सर्व शिक्षकवर्ग उपस्थित होते. विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृती, परंपरा आणि सणांचे महत्त्व रुजावे, या उद्देशाने उत्सवाचे आयोजन करण्यात आल्याचे शाळेच्या वतीने सांगण्यात आले. कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.
