Headlines

कोल्हापूर विभागीय अधिस्विकृती समितीवर गजानन नाईक यांची फेरनिवड

कोल्हापूर : महाराष्ट्र शासनाच्या कोल्हापूर विभागीय अधिस्वीकृती समितीवर ज्येष्ठ पत्रकार गजानन नाईक यांची पुन्हा निवड करण्यात आली आहे. कोल्हापूर विभागीय समितीची मुदत जुलै अखेर संपली होती.
शासनाने नव्याने शासन आदेश काढून राज्यातील सर्व समित्यांच्या निवडीला एक वर्षाची मुदतवाढ दिली आहे.
कोल्हापूर ,पुणे, नागपूर, कोकण, लातूर ,औरंगाबाद आधी सर्व विभागीय समित्याना मुदत देण्यात आली आहे.
कोल्हापूर विभागीय समितीमध्ये सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यांचा समावेश असून या समितीचे अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार समीर देशपांडे त्यांची नियुक्ती झाली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जास्तीत जास्त पत्रकारांनी शासनाची अधिस्विकृती मिळवण्यासाठी विहित नमुन्यात अर्ज करावे असे आवाहन गजानन नाईक यांनी केले आहे.

You cannot copy content of this page